आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Baltimore Landslide Video Captures Cars Being Swallowed

90 सेकंदामध्ये डझनभर गाड्यांना समाधी, बाल्टीमोर येथे भूस्खलनादरम्याची घटना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क : बाल्टीमोर येथे गेल्या बुधवारी झालेल्या भूस्खलनादरम्यान लोकांना एक आश्चर्यकार दृश्य बघायला मिळाले. लोकांनीही वेळ न दवडता त्याचा व्हिडिओ तयार केला. सध्या यू ट्यूबवर बाल्टीमोरच्या या व्हिडिओची जोरदार चर्चा आहे. या भूस्खलनात कोणत्याही प्रकारची हानी झाल्याचे वृत्त नाही.

90 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये रस्त्याच्या बाजुला उभ्या असलेल्या सुमारे डझनभर कार पाहता पहता जमीनीत गाडल्या गेल्याचे स्पष्टपणे दिसते. टोंड टोस्ला नावाच्या एका व्यक्तीने हा व्हिडिओ अपलोड केला आहे. लोकांना एका क्षणानंतर काय होणार याचा काहीही अंदाज नसल्याने ते अगदी सहजपणे रस्त्यावर वावरत असल्याचे यात दिसते आहे. रसत्यावर एक पोलिसांची कारही दिसते आहे. लोक या सर्वाचे फोटो काढत असतानाच ही घ़टना घडली. त्यामुळे जमिनीने कार गिळल्याचा भास क्षणभरासाठी होतो.
बाल्टीमोरच्या सन वृत्तपत्राच्या वृत्तानुसार भूस्खलनात पडलेली ही भिंत सुमारे 120 वर्षे जुनी होती. या भिंतीच्या आसपास असणार्या सुमारे 19 घरांमधील नागिरकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. बुधवारी बाल्टीमोरमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला होता. त्यामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती.
पुढील स्लाईडवर पहा व्हि़डिओ...