आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय चॅनेल्स बंद करा: पाकिस्तानी संरक्षण संस्थांची मागणी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद- भारतीय दूरचित्रवाहिन्या राष्ट्रविरोधी अजेंडा राबबित असून त्यांच्या कार्यक्रमाद्वारे पाकिस्तानातील तरुण पिढीला लक्ष्य करत असल्याचा आव आनत येथील संरक्षण संस्थांनी भारतीय वाहिन्यांचे प्रसारण रोखण्याची मागणी केल्याचे स्थानिक प्रसारमाध्यमांच्या वृत्तात म्हटले आहे.
भारत दूरचित्रवाहिण्यांद्वारे शत्रूत्वाचा अजेंडा राबवित आहे. यासंदर्भात पाकिस्तानच्या इलेक्ट्रॉनिक मीडिया प्राधिकरणाकडे(पीइएमआरए) तसेच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या कानावरही ही बाब टाकण्यात आली आहे. यामध्ये पाक तरुणाबाबत व पाकिस्तानी संस्कृतीबाबत तयार होणा-या कार्यक्रमाचा समावेश आहे. भारत अवैध वाहिन्यांमार्फत पाकिस्तानी संस्था आणि देशाविरुद्ध शत्रूत्वाचा अजेंडा राबवत आहे, असे माहिती आणि प्रसारण मंत्रालयातील अधिका-या्च्या हवाल्याने द न्यूजच्या वृत्तात म्हटले आहे. संरक्षण संस्थांनी 2008 पासून किमान तीन वेळेस पीइएमआरए आणि माहिती मंत्रालयाला याबाबत तक्रार नोंदविली आहे. राष्ट्रहितासाठी आर्थिक बाबींचा विचार न करता अवैध भारतीय वाहिन्यांचे प्रसारण रोखण्याची त्यात मागणी करण्यात आली होती. भारतीय वाहिन्यांकडून चालविल्या जाणा-या विषयांबाबत सरकारी संस्थांचे कोणतेही नियंत्रण नाही, असे एका अधिका-याचे म्हणणे आहे. अशा वाहिन्या पाकिस्तानातील सर्व प्रमुख शहरात दाखविल्या जातात. प्रशासनाला जुलै 2009 आणि डिसेंबर 2011 मध्ये याबाबत माहिती देणारे पत्र प्राप्त झाले आहे. याबरोबर प्रसारणावर तीव्र आक्षेप घेणारे तिसरे पत्र यावर्षाच्या सुरुवातीला पाठवण्यात आले.
स्थानिक केबल ऑपरेटर्स पाकिस्तानी संस्कृतीचे अवमुल्यन करणारे तसेच राष्ट्रविरोधी कार्यक्रम दाखवणा-या वाहिन्यांचे प्रसारण करून नियमांचा भंग करत आहेत. भारतीय करमणूक प्रधान वाहिन्या तरुण दर्शकांना लक्ष्य करत, संस्कृती व राष्ट्रविरोधी कार्यक्रम राबवित असल्याचे माध्यमांच्या वृत्तात म्हटले आहे. भारतीय वाहिन्यांचे प्रसारण आठवडाभरात बंद होण्यासाठी पीईएमआरएने आवश्यक ती पावले उचलावीत अशी मागणी संरक्षण संस्थांनी केली आहे.