आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ban Of Doud Ibrahim's Brother Anis Kasakar By America

डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ अनिस कासकरवर अमेरिकेकडून निर्बंध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अमेरिकेने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ अनिस कासकरसह दोन भारतीयांवर निर्बंध घातल्याचे जाहीर केले आहे. डी कंपनीशी संबंधित पाकिस्तानी वृत्तपत्रावरदेखील निर्बंध घालण्यात आले आहेत. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक आेबामा यांच्या भारत दौ-यापूर्वी ही पावले उचलण्यात आली आहेत.

अमेरिकेचे फॉरेन असेट्स कंट्रोल विभागाचे संचालक एडम जे. जुबिन यांनी ही माहिती दिली. अनिस डी कंपनीसाठी मादक पदार्थांची तस्करी, खंडणी वसुली, सुपारी घेऊन हत्या, हवाला इत्यादी गोष्टी करत होता. तो १९९३ च्या साखळी बाॅम्बस्फोट घटनेतील आरोपी आहे.

दाऊदचे नेटवर्क दक्षिण आशियात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकी दौ-यावर हा संकल्प करण्यात आला होता. त्यात पाकिस्तानात असलेल्या दाऊद इब्राहिमच्या नेटवर्कचाही समावेश होता. दक्षिण आशियात दाऊदचे नेटवर्क चालू आहे.