आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर कोरियावर ‘युनो’चे निर्बंध

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संयुक्त राष्ट्र/ सेऊल - जागतिक दबावापुढे न झुकता अणु व क्षेपणास्त्र कार्यक्रम राबवणा-या उत्तर कोरियावर संयुक्त राष्‍ट्र ने अखेर निर्बंध लादले. उत्तर कोरियाने गेल्या महिन्यात प्रतिबंधित रॉकेटची चाचणी घेतली होती. संयुक्त राष्‍ट्र च्या सुरक्षा परिषदेने त्याविरोधात एकमताने ठराव मंजूर करून निर्बंध लादले असून अणु चाचणी घेतल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा जारी केला आहे.
दरम्यान, उत्तर कोरियाने या कृतीचा निषेध केला असून शक्य झाल्यास अणु चाचणी घेण्याचा प्रतिइशारा दिला आहे. कोरिया अण्वस्त्रमुक्त करण्याबाबतची चर्चा प्रक्रिया सुरू करण्यास उत्तर कोरियाने नकार दिला आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावामुळे उत्तर कोरियाच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन करण्यात आले आहे, अशी प्रतिक्रिया परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रकात दिली आहे. स्वसंरक्षणासाठी लष्करी ताकद वाढवण्याचा आम्हाला अधिकार असून यामध्ये अण्वस्त्र सामर्थ्याचाही समावेश आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. निर्बंधामुळे कोरियाच्या दोन संस्था, बॅँक, चार व्यापारी संस्था व चार व्यक्तींची संपत्ती गोठवण्यात येणार आहे.