आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bangladesh Court Sentences 14 To Death, Including ULFA Leader Paresh Barua

बांगलादेश: शस्त्र तस्करी प्रकरणीमाजी उद्योगमंत्रीसह 14 दोषींना फाशी!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ढाका- भारतात सक्रिय असलेली उग्रवादी संघटना 'उल्फा'चा शांतीवार्ता विरोधी गटाचे नेता परेश बरूआ यांच्यासह 13 जणांना बांगलादेशातील एका कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. जमातचे प्रमुख तत्कालीन उद्योगमंत्री मोतीऊर रहमान निजामी आणि तत्कालीन गृहमंत्री लुत्फजमां बाबर यांचा यात समावेश आहे. 2004 मध्ये शस्त्रांची तस्करी प्रकरणी सगळ्यांना कोर्टाने दोषी ठरविले होते.
'डेली स्टार'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, चटगांव विशेष कोटाने 2004 मध्ये 10 ट्रकमधून झालेल्या शस्त्राच्या तस्करीप्रकरणी निकाल दिला आहे. न्यायाधीश मोजिबुर रहमान यांनी हा निकाल दिला. हाय कोर्टाच्या परवानगीनंतरच हा निर्णय दिल्याचेही रहमान यानी सुनावणी दरम्यान सांगितले.
दरम्यान, भारतीय उग्रवादी संघटना 'उल्फा'ला 2 एप्रिल 2004 रोजी शस्त्र पाठण्यात येत होते. चटगांव बंदरगाहमधील यूरिया उर्वरक निगम परिसरात शस्त्रास्त्र भरलेले 10 ट्रक पोलिसांनी जप्त केले होते. यात 4,390 अत्याधुनिक आग्नेयास्त्र, 840 रॉकेट लान्चर, 300 रॉकेट, 27,020 ग्रेनेड, 2,000 ग्रेनेड लान्चर, 6,392 मॅगझिन आणि 1,141 कोटी काडतुसं जप्त करण्यात आले होते.
चटगांव मेट्रोपोलिटन न्यायाधीश रहमान यांनी 14 फेब्रुवारी 2011 रोजी या प्रकणाची नव्याने चौकशी करण्‍याचे आदेश दिले होते. जून 2011 मध्ये गुन्हे अन्वेषण विभागाने नव्याने आरोपपत्र कोर्टात दाखल केले होते. यात 11 नव्या संशयीताना सहभागी करून घेण्यात आले होते. परेश बरूआ आणि त्याचा साथीदार्‍याचा समावेश आहे. बरूआ आणि उद्योग मंत्रालयचे माजी सचिव सचिव नुरूल अमीन घटनास्थळावरून फरार झाले होते. अन्य नऊ आरोपींना घटनास्थळी पोलिसांनी अटक केली होते.