ढाका - बांग्लादेशातील पद्मा नदीत क्षमतेपेक्षा दुप्पट प्रवासी वाहून नेणारे जहाज बुडाल्याची घटना सोमवारी घडली. या जहाजात 250 प्रवासी होते. यापैकी 12 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 190 प्रवासी अजूनही बेपत्ता आहेत. मदतकार्यात 45 जणांना वाचवण्यात आले आहे. अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नदीचा प्रवाह प्रचंड वेगात असल्यामुळे मुशीगंज परिसरात हे जहाज बुडाले.
घटनास्थळावरून एका पोलिस अधिकार्याने फोनवरून दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत दोन मृतदेह हाती आले असून घटना घडल्यानंतर तत्काळ आजूबाजूच्या परिसरातील पाणबुडी व स्पीडबोटींच्या मदतीने 45 प्रवाशांचे प्राण वाचवण्यात आले.
पद्मेचा रुद्रावतार : बांग्लादेशातील काही टीव्ही चॅनल्सनुसार, अत्यंत खराब हवामानामुळे घटनास्थळावरील मदत कार्यात अडथळे येत आहे. पद्मा नदीने रुद्रावतार धारण केल्यामुळे जिवंत अथवा प्रवाशांचे मृतदेह शोधणेही कठीण जात आहे. हे जहाज केवराकांडी येथून मावा टर्मिनल्सला जात होते. जहाजातील अजूनही अनेकजण बुडाल्याची भीती, मुशीगंज येथील पोलिसप्रमुख तोफाज्जल हुसैन यांनी व्यक्त केला आहे.
(फाईल फोटो)