आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bangladesh Ferry Capsizes With 250 People On Board, Divya Marathi

बांगलादेशमध्‍ये 200 प्रवासी नेणारे जहाज उलटले, दोन महिलांचा मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ढाका - बांगलादेशमधील मुन्शीगंज जिल्ह्यामध्‍ये 200 प्रवाशांना नेणारे एक जहाज सोमवारी( ता. 4) पद्मा नदीत उलटले. यात दोन महिलांचा मृत्यू झाला आहे , असे स्थानिक अधिका-यांने सांगितले आहे. बचाव पथकाला 100 लोकांना आतापर्यंत वाचवण्‍यात यश आले असून इतर बेपत्ता प्रवाशांचा शोध चालू आहे.
जहाज एम व्ही पिनाक-6 मधून प्रवास करणारे बहुतेक लोक ईद सण साजरा करून आपापल्या घरी परतत होते. बांगलादेशचे अंतर्गत जल परिवहन प्राधिकरण आणि सेनेने आपले बचाव कार्य सुरू केले आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी जहाजमध्‍ये असल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगण्‍यात येत आहे.