आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Bangladesh Government Orders Probe Into Nobel Award Winner Mohammad Younus

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बांग्‍लादेश सरकारकडून मोहम्‍मद युनूस यांची नव्याने चौकशी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ढाका- निवृत्तीनंतरही वेतन आणि इतर भत्ते घेण्याचा ठपका ठेवून बांगलादेश सरकारने नोबेल पुरस्कार विजेते प्रा.मुहम्मद युनूस यांची नव्याने चौकशी करण्याचे दिले आहेत. ग्रामीण बँके च्या माध्यमातून ,बचतगटाच्या संकल्पनेव्दारे लाखो लोकांच्या आयुष्य बदलवणा-या युनूस यांच्यामागे चौकशीचे शुक्लकाष्ठ लावून त्यांचे पंख कापण्याचे प्रयत्न बांगलादेश सरकारने सुरु केले आहेत. निवृत्तीच्या वयानंतरही ग्रामीण बँकेकडून वेतन,भत्ते उचलणे, परदेशातून आणलेला पैसा आणि आयकराचीही चौकशी करण्याचे आदेश शेख हसीना सरकारने दिले आहेत.
ग्रामीण बँके शी संबंधित मुद्यांवर कॅबिनेटमध्ये सखोल विचारविनीमय केल्यानंतर त्या संबंधित खात्यांना तपशीलवार अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती कॅबिनेट सचिव मुशर्रफ हुसेन भुईयाँ यांनी दिली. पंतप्रधान शेख हसीना यांच्या नेतृत्वाखाली आज झालेल्या बैठकीनंतर ते बोलत होते.ग्रामीण बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी असताना वयाच्या 61 व्या वर्षांनंतर त्यांनी वेतन आणि भत्ते घेतले.त्याला कायदेशीर आधार आहे का याबद्दल स्पष्टीकरण देण्यास संबंधित खात्यांना सांगण्यात आले आहे.
वेतनासोबतच युनुस यांनी परदेशातून आणलेल्या पैशांचीही चौकशी करण्यात येणार आहे.परदेशातून आणलेला पैसा, युनूस यांनी भरलेला प्राप्तिकर आणि नोकरदार म्हणून त्यांना प्राप्तिकरातून देण्यात आलेली सूट आदींचा बारीकसारीक तपशील सरकारला सादर करण्याचे आदेश बांगलादेशच्या राष्ट्रीय महसूल मंडळाला (एनबीआर) देण्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर सरकारी व्याख्येनुसार युनुस ‘नोकरदार’ठरतात का याचाही तपास करण्यास सांगण्यात आले आहे.

कशामुळे शुक्लकाष्ठ
युनूस यांच्यामागे चौकशीचे शुक्लकाष्ठ लागण्याचे कारण म्हणजे लाचखोरी व भ्रष्टाचाराची शंका आल्यामुळे जागतिक बँकेने अब्जावधींचे कर्ज देण्यास बांगलादेशला नकार दिला आहे.हे कर्ज नाकारण्यामागे युनूस यांचा हात असल्याचा हसीना सरकारमधील अनेक नेत्यांना संशय आहे.

नेमके कारण काय
सन 2007 मध्ये युनूस यांनी राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली होती. यामुळे बांगलादेशच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. अनेक पक्षांचा, राजकीय नेत्यांचा युनूस यांना विरोध होता. मात्र, अमेरिकेसह पाश्चात्त्य देशांनी युनूस यांना पाठिंबा दिला होता. इथेच सरकार आणि युनूस यांच्यात वादाची ठिणगी पडली.