आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bangladesh Islamist Leader Motiur Rahman Nizami Sentenced To Death

बांगलादेशमध्ये इस्लामी पार्टी प्रमुखास फाशी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ढाका - बांगलादेशातील राजकीय पक्ष जमात-ए-इस्लामीचे प्रमुख मतीउर रहेमान निझामी (७१) यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. १९७१ च्या युद्धात रहेमान दोषी आढळून आल्याचे विशेष न्यायालयाने स्पष्ट करत हा फैसला सुनावला. युद्धात लुटमार, हत्येसह अनेक प्रकरणात त्यांना दोषी ठरवण्यात आले आहे.

२००४ मध्ये आसाममार्गे भारतात शस्त्रांची तस्करी केल्याच्या प्रकरणातही रहेमान दोषी आढळून आले होते. विशेष न्यायालयाच्या न्यायाधीशांनी २०४ पानांचे निकालपत्र जाहीर केले. हा निवाडा जाहीर करण्यासाठी एक तासाचा कालावधी लागला. २००१ ते २००६ दरम्यान रहेमान बांगलादेशचे कृषी आणि उद्योगमंत्री देखील राहिले आहेत.

१६ पैकी आरोप खरे
रहेमानयांच्यावरील १६ पैकी आरोप कोणत्याही संशयाशिवाय खरे असल्याचे कोर्टाने मान्य केले. त्यात फाशीपेक्षा कमी अशी कोणतीही शिक्षा होणार नाही, असे सांगण्यात आले.

तीन दिवस बंद
जमात-ए-इस्लामी पार्टीच्या वतीने निकालाच्या विरोधात गुरुवार, रविवार आणि सोमवारी बांगलादेश बंदचे आवाहन केले आहे. बंद काळात हिंसाचाराची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे सरकारने शिक्षेच्या विरोधात कोणतेही अपील करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

फाळणीच्या काळात अनेकांची हत्या
रहेमानयांनी ४३ वर्षांपूर्वी देशातील प्रसिद्ध प्राध्यापक, डॉक्टर, लेखकांची षड्यंत्र करून हत्या केल्याचा ठपका आहे. १९७१ मध्ये बांगलादेश फाळणीच्या वेळी रहेमान कुख्यात मिलिशिया अल बद्र नावाच्या संघटनेचे प्रमुख होते.