ढाका - १९७१ च्या युद्धातील प्रमुख युद्ध गुन्हेगार आणि जमात-ए-इस्लामी या कट्टरवादी संघटनेचा नेता दिलावर हुसैन सय्यदी याच्या फाशीची िशक्षा रद्द करण्यात आली आहे. बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाने फाशी रद्द करून त्याला बुधवारी जन्मठेप सुनावली.
मुख्य न्यायाधीश एम. मुजम्मिल हुसैन यांनी िशक्षा बदलाचा निवाडा केला. या वेळी न्यायकक्षात प्रचंड गर्दी होती. न्यायालयाच्या या िनर्णयाबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
पाचसदस्यीय न्यायपीठाने बहुमत घेऊन िशक्षेत बदल केल्याचे या वेळी सुनावणीत सांगण्यात अाले. मात्र, कितीच्या फरकाने हे बहुमत सिद्ध झाले, हे न्यायकक्षात जाहीर करण्यात अाले नाही. िदलावर याला फेब्रुवारी २०१३ मध्ये आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायािधकरणाने (इंटरनॅशनल ट्रीब्यूनल ) फाशीची िशक्षा सुनावली होती. त्या वेळी दिलावर हुसैनने घडवून आणलेली राजकीय िहंसा, ही बांग्लादेशच्या इतिहासातील सर्वात भयंकर िहंसा असल्याची टिप्पणी न्यायािधकरणाने केली होती.