आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bangladesh News In Marathi, Supreme Court Upholds Jamaat Leader\'s Death Penalty

मिरपूरच्या हैवानाला फाशीच, बांगलादेश सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ढाका (बांगलादेश)- 1971 मध्ये निरपराध नागरिकांवर माणुसकीला काळिमा फासणारे अत्याचार केल्याप्रकरणी जमात-ए-इस्लामी या संघटनेचा नेता अब्दुल कादेर मुल्ला याची फाशीची शिक्षा बांगलादेश सर्वोच्च न्यायालयाने आज (गुरुवार) कायम ठेवली.
अब्दुल मुल्ला याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ही शिक्षा अंमलात आणण्यापूर्वी अगदी शेवटच्या क्षणी झालेल्या नाट्यमय घडामोडीत बांगलादेश सरकारकडून शिक्षेला स्थगिती देण्यात आली होती. त्यानंतर मुल्लाने सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली होती. परंतु, न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे.
अब्दुल मुल्ला याने सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली होती. त्यावर सुमारे दोन दिवस चर्चा झाली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे प्रधान न्यायाधीश मुझम्मील हुसैन यांनी ही याचिका फेटाळून लावली. यावेळी हुसैन केवळ एवढे म्हणाले, की रिजेक्टेड.
या निर्णयाने अब्दुल मुल्ला याला फाशीची शिक्षा देण्यामधील अंतिम अडथळा दूर झाला आहे. सध्या या 65 वर्षीय गुन्हेगाराला कडेकोट सुरक्षा असलेल्या ढाका तुरुंगात ठेवण्यात आले आहे.
उच्च न्यायालयाचा आदेश कायम राखत न्याय समितीने मुल्ला याची जन्मठेप कायम ठेवली होती. परंतु, त्यानंतर अॅपेलाईट डिव्हिजनने जन्मठेप रद्द करून त्याला फाशीची शिक्षा सुनावली आहे.
अब्दुल मुल्ला आहे मिरपूरचा हैवान... वाचा पुढील स्लाईडवर