आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बांगलादेशच्या संसदेची मृत्युदंडाच्या शिक्षेस मंजूरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


ढाका - बांगलादेशच्या संसदेने सोमवारी मृत्युदंडाच्या शिक्षेतील सुधारणेस मंजुरी दिली. त्यामुळे कट्टरवादी इस्लामी पार्टीचे नेते अब्दुल कादीर मुल्ला यांना मिळालेल्या कैदेच्या शिक्षेला न्यायालयात आव्हान देण्याचा सरकारचा मार्ग मोकळा होणार आहे. 1971 च्या युद्धात देशाविरुद्ध कारवाई करणा-या अब्दुल कादीर यांना तत्काळ फासावर लटकवा, अशी मागणी करण्यासाठी बांगलादेशातील जनता रस्त्यावर उतरली आहे. हजारो लोकांनी मागणी लावून धरताना अनेक ठिकाणी निदर्शने केली. या पार्श्वभूमीवर ढाकामध्ये नागरिकांनी मृत्युदंडाच्या सुधारणेच्या निर्णयाचे जोरदार स्वागत केले आहे. सरकार निर्णयाला आव्हान देणार आहे. त्याचबरोबर कट्टरवादी जमात-ए-इस्लामी या संघटनेवरील बंदी घालण्याचा मार्गही सरकारसाठी मोकळा झाला आहे