आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bangladesh President Jil Ur Raheman Dies In Singapore

बांगलादेशचे राष्ट्रपती जिल-उर रहेमान यांचे निधन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ढाका- बांगलादेशचे राष्ट्रपती जिल-उर रहेमान यांचे बुधवारी सिंगापुर येथे बुधवारी संध्याकाळी पावणे सातच्या सुमारास निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. सिंगापूर येथील रुग्णालयात रहेमान यांच्यावर उपचार सुरु होते. किडनी आणि श्वसनाचा त्रास होता. सिंगापूरचे बांगलादेशाचे उच्चायुक्त मेहबूब उज जमान यांनी सांगितले की, माऊंट एलिजाबेथ रुग्णालयात जिल उर रहेमान यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली. रहेमान यांच्या निधनामुळे बांगलादेश सरकारने तीन दिवसांचा दुखवटा पाळला आहे. जिल उर रहेमान यांना 10 मार्चला श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे सिंगापूर येथील रुग्णालयात दाखल करण्‍यात आले होते. सन 2009 मध्ये सत्ताधारी पक्ष आवामी लीगचे नेता जिर उर रहेमान यांची राष्ट्रपती निवड झाली होती.