आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बांगलादेशमध्ये आणखी एका नेत्याला फाशी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ढाका - बांगलादेशच्या विशेष न्यायालयाने मंगळवारी जमात-ए-इस्लामीचा वरिष्ठ नेता ए. टी. एम. अजहरूल इस्लामला(६२) फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. अजहरूलला १९७१ च्या स्वातंत्र्य युद्धादरम्यान नरसंहार, हत्या, छळ आणि अत्याचारासारख्या आरोपांत दोषी ठरवले होते.

अजहरूल जमात-ए-इस्लामचा सहायक सरचिटणीस आहे. न्या. इनायतूर रहिम यांनी निकाल देताना सांगितले की, दोषीला फाशीच्या शिक्षेशिवाय अन्य शिक्षा होऊ शकत नाही. त्याच्यावरील सहा आरोपांपैकी पाचमध्ये तो नि:संशय दोषी आहे. शिक्षेनंतर अजहरूल मोठमोठ्याने ओरडत म्हणाला, सरकारनेच माझ्या शिक्षेचा निकाल लिहिला आहे. कायद्यानुसार अजहरूल इस्लाम निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान दाखल करू शकतो. रंगपूरमध्ये १,२२५ लोकांची हत्या केल्याचा त्याच्यावर आरोप होता. याबरोबर कारमिशेल कॉलेजचा एक प्रोफेसर आणि त्याच्या पत्नीचे अपहरण करून हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते.