आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बांगलात लष्कराचा कट उधळला

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ढाका - बांगलादेशमधील लोकशाही प्रणालीस सुरुंग लावून शेख हसिना यांचे सरकार उलथवण्याचा कट उधळून लावण्यात आला आहे. अनेक लष्करी अधिका-यांचा सहभाग असलेल्या या कटातील दोन माजी लष्करी अधिका-यांना अटक करण्यात आली आहे.
लोकशाही व्यवस्था नष्ट करण्यासाठी करण्यात येणाºया या कटात लष्करातील काही वरिष्ठ अधिका-यांचा सहभाग असल्याचे मिळालेल्या पुराव्यावरून स्पष्ट होत आहे. हे वरिष्ठ अधिकारी सरकारविरोधी तत्वांना अत्यंत महत्वाची माहिती पुरवत असल्याचे उजेडात आले आहे, असे लष्कराचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल मोहम्मद मसुद रझाक यांनी सांगितले. या कटात लष्करातील सक्रिय अधिका-यांचा सहभाग आहे हे अधिक धक्कादायक आहे. विशेष म्हणजे देशाला हवा असलेल्या सइद मोहम्मद झियाऊल हक याच्याशी मोबाइल, इंटरनेटच्या माध्यमातून संपर्क करण्यात आल्याचे पुरावे मिळाले आहेत, असे रझाक यांनी पत्रकारांना सांगितले. हा कट उघडकीस आल्यानंतर लष्करातील 14 ते 16 अधिका-यांची आता चौकशी
करण्यात येणार आहे. त्यांच्यावर लष्कराला संशय आहे.
संशयित लष्करी अधिका-यांची चौकशी होणार आहे. या प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्या दोन माजी लष्करी अधिका-यांनी आपला या कटात सहभाग असल्याची कबुली दिली असल्याची माहिती लष्कराचे प्रवक्ते ब्रिगेडियर रझाक यांनी दिली. परंतु या कटाविषयीचा अधिक तपशील देण्यास त्यांनी नकार दिला.
दुसरीकडे या कटामागील कारण काही लष्करी अधिका-यांच्या शिक्षेचे सांगितले जात आहे.
फझल नूर तपोश यांच्या हत्येमागे हात असल्याप्रकरणी त्यांचे कोर्ट मार्शल झाले होते. तपोश हे हसिना यांचे पुतणे होते. त्यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवून त्यांचे कोर्ट मार्शल करण्यात आले होते. त्यानंतर लष्करात हसिना यांच्या विरोधात असंतोषाची भावना निर्माण झाल्याने हा कट शिजला, असे सांगितले जाते.