आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्षमायाचना आणि आशीर्वादासाठी मानवतेचा महापूर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ढाका - बांगलादेशची राजधानी ढाक्यापासून 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या टोंगी येथे तुरग नदीच्या काठी मुस्लिम बांधवांचे जगातील दुसर्‍या क्रमांकाचे सर्वात मोठे वार्षिक संमेलन विश्व इज्तेमा भरले आहे. जगातील मानव जातीसाठी क्षमायाचना आणि आशीर्वाद मागण्यासाठी हे संमेलन आयोजित करण्यात येते. या इज्तेमासाठी जगभरातील मुस्लिम बांधव लाखोंच्या संख्येने गोळा झाले आहेत. सौदी अरेबियातील हज यात्रेनंतर टोंगीमध्ये जगभरातील मुस्लिम बांधव लाखोंच्या संख्येने या इज्तेमासाठी हजर राहतात. या इज्तेमाच्या शेवटच्या दिवशी ‘अखेरी मुनाजत’ (समारोपाची प्रार्थना) आटोपल्यानंतर विमानतळ रेल्वे स्टेशनवर मुस्लिम भाविकांनी रेल्वेत मिळेल तिथे बसून परतीचा प्रवास सुरू केला. गर्दी एवढी प्रचंड होती की माणसांच्या झुंडींनी अख्खी रेल्वेच झाकून गेली होती.