आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Barac Obama's Proposal Of Weapons Control Citizen Against It

बराक ओबामाच्या शस्त्रास्‍त्र नियंत्रण प्रस्तावास नागरिकांचा विरोध

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - राष्‍ट्रपती बराक ओबामा यांनी देशात शस्त्रास्त्र नियंत्रणाचा प्रस्ताव ठेवला होता. त्याच्याविरोधात रविवारी देशभर नागरिकांनी रस्त्यावर उतरून रॅली काढून तीव्र नाराजी प्रकट केली. ओबामांचा शपथविधी सोहळा सुरू असतानाच हा मुद्दा चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रस्तावामुळे शस्त्रास्त्रे जवळ बाळगण्याच्या आपल्या अधिकारांत कपात होईल, अशी भीती नागरिकांना वाटत आहे.

ब्रुक्सविलेमध्ये एक हजार लोकांनी रस्त्यावर उतरून रविवारी मोठी रॅली काढली.बंदूक जवळ बाळगण्यास रोखण्याऐवजी जे गोळीबार करत आहेत त्यांना रोखा. कनेक्टिकटमध्येही जवळपास दीड हजार लोकांनी रॅली काढली. याच ठिकाणी गेल्या महिन्यात एका शाळेत गोळीबार झाला होता. त्यात 26 जण ठार झाले होते. ओबामा आज 10 राउंड मॅगझिन परत घेत आहेत. उद्या ते 5 राउंडची मॅगझिन काढून घेतील. एक दिवस सगळीच शस्त्रे परत मागतील, असा लोकांचा आक्षेप आहे. ओबामांनी तीन दिवसांपूर्वी देशात शस्त्रास्त्र नियंत्रणासंबंधी काढण्यात आलेल्या 23 अध्यादेशांवर स्वाक्ष-या केल्या आहेत. याअंतर्गत उच्च क्षमतेच्या मॅगझिन जवळ बाळगण्यावर बंदी असेल. याशिवाय रिव्हॉल्व्हरचे परवाने देण्यापूर्वीही संबंधित व्यक्तीची कठोर पडताळणी करण्यात येईल.

शस्त्र नियंत्रणाचे समर्थनही
शस्त्र नियंत्रण प्रस्तावास विरोध होत असला तरीही त्याच्या समर्थनार्थही लोक पुढे येत आहेत. या लोकांच्या मते अमेरिकन नागरिकांना त्यांच्या घरात शस्त्रे बाळगण्यास परवानगी देण्याचे काहीच औचित्य नाही. शिवाय परवाने देण्यापूर्वी त्यांची योग्य पडताळणीही झाली पाहिजे.
महिनाभरापासून चर्चा
अमेरिकेत 15 डिसेंबर रोजी कनेक्टिकट प्रांतात न्यू टाऊनमध्ये एका बंदूकधा-या ने प्राथमिक शाळेत गोळीबार केला होता. त्यात 20 चिमुकल्या विद्यार्थ्यांसह 26 जण मारले गेले होते. गोळीबाराच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी शस्त्रास्त्र नियंत्रण कायद्याची मागणी होत होती.
चर्चला शस्त्रास्त्रे परत करण्यासाठी लागली रांग
ओबामांच्या शस्त्र नियंत्रण प्रस्तावाला विरोध होत असतानाच चर्चच्या आवाहनानंतर लोकांनी रांगा लावून शस्त्रे परत केल्याचे आश्वासक चित्रही दिसले. सिनसिनाटी चर्चने लोकांना बंदूक परत करण्याचे आवाहन केले होते. त्याच्या मोबदल्यात 100 डॉलरची भेट देण्याचे आश्वासनही दिले होते. त्यानंतर चर्चमध्ये बंदूक परत करण्यासाठी अशी रांग लागली. या अभियानापासून पोलिसांना दूर ठेवण्यात आले होते. लोकांना शस्त्रांबाबत काहीच विचारण्यात आले नाही.