आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पॅरिस, वॉशिंग्टन- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि सुपरस्टार गायिका बियॉन्स यांचे प्रेमसंबंध असल्याचा गौप्यस्फोट फ्रान्सच्या एका छायाचित्रकाराने केला आहे. या गौप्यस्फोटानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्सवॉँ ओलांद अमेरिकेच्या दौर्यावर असताना हा गौप्यस्फोट झाल्याने फ्रेंच मीडियानेही त्याला जोरदार प्रसिद्धी दिली. मात्र हे वृत्त म्हणजे बिनबुडाचे आणि खुळचट असल्याचा खुलासा बियॉन्सने केला आहे. फ्रेंच मुक्त छायाचित्रकार पास्कल रोस्तें यांनी युरोप वन या रेडिओ स्टेशनला सोमवारी दिलेल्या मुलाखतीत हा गौप्यस्फोट केला. 52 वर्षीय ओबामांपेक्षा बियॉन्स वीस वर्षांनी लहान आहे. बियॉन्स व तिचा पती रॅप गायक जे झेड यांचे ओबामा कुटुंबीयांशी घरोब्याचे संबंध आहेत. ओबामांच्या दुसर्या निवडणुकीत या पती-पत्नी गायकांनी सन 2012 मध्ये सुमारे 25 कोटी रुपये निधी संकलन केले होते.
‘वॉशिंग्टन पोस्ट’चा हवाला
रोस्तें याने ओबामा-बियॉन्स यांच्यातील अफेअरबद्दल माहिती देताना या बातमीसाठी वॉशिंग्टन पोस्ट या प्रतिष्ठित अमेरिकी वृत्तपत्राचा हवाला दिला होता. मात्र पोस्टने तत्काळ रोस्तेंचा दावा फे टाळला. त्या दोघांमध्ये चांगली मैत्री आहे यापेक्षा अधिक माहिती आमच्याकडे नाही, असे स्पष्ट केले.
पुढील स्लाइड्सवर वाचा, कोण आहे बियॉन्स?
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.