(फोटो: व्हाइट हाऊसमध्ये नरेंद्र मोदी यांच्या सन्मानार्थ देण्यात आलेल्या 'डिनर'मधील मेनू)
वॉशिंग्टन- भारताचे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाच दिवसीय अमेरिका दौरा मंगळवारी सायंकाळी समाप्त झाला. मोदींचा दौरा यशस्वी झाला असून ते मायदेशाकडे रवाना झाले आहेत.
नरेंद्र मोदी यांच्या सन्मानार्थ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी व्हाइट हाऊसमध्ये 'डिनर' आयोजित केले होते. डिनरमध्ये विविध व्यंजने होती. त्यात नॉनव्हेजचाही समावेश होता. यावेळी नरेंद्र मोदी यांनी फक्त कोमट पाणी घेतले. कारण मोदींचे नवरात्रीचे उपवास सुरु आहेत. विशेष म्हणजे या 'डिनर'मध्ये नॉनव्हेज असल्यामुळे ओबामांची पत्नी आणि अमेरिकन 'फर्स्ट लेडी' मिशेल ओबामा या सहभागी झाल्या नसल्याचे बोलले जात आहे.
'डिनर'वेळी मोदी आणि ओबामा यांच्याशिवाय भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाळ, परराष्ट्र सचिव सुजाता सिंह आणि अमेरिकेचे भारतीय राजदूत एस. जयशंकर यांच्यासह एकूण 20 जण उपस्थित होते.
पुढील स्लाइड्सवर वाचा, डिनरमध्ये अन्य पदाधिकार्यांनी मद्य सेवन करून मास्यांवर मारला ताव...