बराक ओबामा आणि / बराक ओबामा आणि आठ महिन्यांच्या चिमुरड्यात रंगलेली लढत!

वृत्तसंस्था

Dec 27,2011 11:32:54 AM IST

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्‍ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना यंदाच्या ख्रिसमस पार्टीत एक वेगळाच अनुभव आला. एका आठ महिन्यांचा चिमुरडा आणि बराक ओबामा यांच्यात रंगतदार लढत झाली. परंतु, चिमुरड्यासोबत झालेल्या या लढतीत जगातील प्रभावशाली व्यक्तीमत्त्वाचे धनी असलेल्या ओबामा यांना पराभूत व्हावे लागले. या चिमुरड्‍याने काही क्षणातच बराक ओबामांना ‍जिंकून घेतले.
'मरीन कॉर्प्स बेस' येथे ख्रिसमसनिमित्त आयोजित कार्यक्रमात बराक ओबामा सपत्नीक उपस्थित होते. वायुदलाच्या जवानांसोबत त्यांनी ख्रिसमसचे सेलिब्रेशन केले. याप्रसंगी कॅप्टनच्या एका आठ महिन्यांच्या चिमुरड्याने ओबामांचे मन जिंकले. त्यांनी त्याला कुशीत घेतले तेव्हा त्या चिमुरड्याने ओबामांना एक जोरदार ठोसा दिला. छायाचित्रांत पाहा... ओबामा आणि आठ महिन्यांच्या चिमुरड्यामध्ये रंगलेली लढत.X
COMMENT