आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Barack Obama Is Sworn Into Office At The White House

ओबामांनी घेतली राष्ट्रध्यक्षपदाची शपथ, आज जनता होणार साक्षीदार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय अध्यक्ष बराक ओबामा यांनी व्हाईट हाऊसमध्ये आयोजित एका छोटेखानी समारंभात राष्ट्राध्यक्षपदाची दुस-यांदा शपथ घेतली. ओबामा यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या दुस-या कार्यकाळाला आता प्रारंभ झाला आहे. ओबामांच्या आधी उपाध्यक्ष ज्यो बिडेन यांनीही दुस-या कारकिर्दीस शपथ घेऊन प्रारंभ केला.
व्हाईट हाऊसच्या ब्ल्यू रुम मध्ये आयोजित समारंभात अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश जॉन रॉबर्टस् यांनी ओबामांना शपथ दिली. यावेळी काही उच्चपदस्थ अधिकारी आणि ओबामांची पत्नी मिशेल व मुली मलिया आणि साशा उपस्थित होत्या.

ओबामा आज (सोमवार) पुन्हा कॅपिटल हिल येथे आयोजित सार्वजनिक सोहळ्यात जाहीर शपथ घेणार आहेत. अमेरिकी राज्यघटनेतील २० व्या घटनादुरुस्तीनुसार ४ मार्चऐवजी २० जानेवारी दुपारी १२ वाजतापासून नव्या अध्यक्षाची कारकिर्द सुरु होते. यंदा मात्र, २० जानेवारी रोजी रविवार सार्वजनिक सुटीचा दिवस असल्याने अध्यक्षांचा जाहीर शपथविधी सोहळा सोमवारी पुन्हा होणार आहे. नवनिर्वाचित अध्यक्षाने सोमवारी शपथ घेण्याची ही सातवी वेळ आहे.