आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Us President Barack Obama Meets New Saudi King Salman At Riyad

सौदी: ओबामा- किंग सलमान यांची भेट, किंग अब्दुल्लांच्या निधनाबद्दल व्यक्त केले दु:ख

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रियाद- अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी सौदी अरेबियाचे नवे किंग सलमान यांची भेट घेऊन किंग अब्दुल्ला यांच्या निधनाबाबत दु:ख व्यक्त केले. या दोघांत अशांत असा अरब प्रदेशाच्या सुरक्षा सहकार्याबाबत चर्चा केली. ओबामा मंगळवारी नवी दिल्‍लीतून सौदीत पोहचले होते. एका अमेरिकी अधिका-याने म्हटले आहे की, नवे किंग सलमान यांनी पदभार घेतल्यानंतर इरानच्या छुप्या अण्वस्त्र कार्यक्रम रोखण्याच्या अमेरिकेच्या प्रयत्नात बाधा न आणण्याचे ठरवले आहे. सौदी किंगने तेहरानला अण्वस्त्र हत्यारे बनविण्याची परवानगी देणार नसल्याचे म्हटले आहे.
अमेरिकी अधिका-याने सांगितले की, जगातील सर्वात मोठा तेल उत्पादक व निर्यात करणारा देशाच्या नव्या राजाने ऊर्जा योजना निरंतर ठेवण्याचे संकेत दिले आहेत. दोनों देशांदरम्यान तेल बाजारातील स्थिरतेबाबत चर्चा झाली. मात्र तेलाच्या किंमतीत घट करण्याच्या मुद्यांवर कोणतेही चर्चा झाली नाही.
ओबामा यांनी सौदीला अशा वेळी भेट दिली आहे जेथे अमेरिका इराक आणि सीरियात गोळा झालेले इस्लामिक स्टेटचे दहशतवाद्यांचा सफाया करू इच्छित आहेत. सौदी अरब हा एक असा मुस्लिम देश आहे ज्याला या इस्लामिक स्टेट बनविण्याबाबत कोणताही रस नाही. सौदी आणि अमेरिकेचे पहिल्यापासून उत्तम संबंध आहेत. ओबामांनी नव्या किंगची भेट घेऊन ही मैत्री कायम जोपसण्यासाठीचे पाऊल टाकल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे प्रेमाचे प्रतिक असलेल्या ताजमहालचा दौरा रद्द करून ओबामांनी पत्नी मिशेलसह सौदीला जाणे पसंत केले होते.
पुढे पाहा, सौदीत पोहचलेले ओबामांची छायाचित्रे...