आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओबामांनी केली पळपुट्याची मुक्तता?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
31 मे रोजी अध्यक्ष बराक ओबामा अफगाण युद्धातील एकमेव अमेरिकन सैनिकाला मुक्त करण्याची घोषणा करताना काहीसे काळजीत होते. त्यांना वाटत होते की, अमेरिकन जनता ही वास्तवता मान्य करू शकेल का? सार्जंट बोवे बर्गडहलचे आई-वडिलांच्या उपस्थितीत ओबामांनी विजेत्याच्या अविर्भावात तालिबान्यांच्या ताब्यातून बोवेला मुक्त करण्याचा तपशील दिला, परंतु त्यांनी बोवेबद्दल त्याच्या लष्करी सहकार्‍यांमध्ये पसरलेल्या रागाविषयी आणि असंतोषाबद्दल काही सांगितले नाही. त्यांना असे वाटते की, 2009 च्या एका रात्री बोवे आपली चौकी सोडून गूपचूप पसार झाला होता.

अध्यक्षांनी बोवेच्या बदल्यात पाच तालिबानी नेत्यांना सोडून आणखी एक गोंधळ केला. लष्कर या समझोत्याच्या बाजूने नव्हते. अमेरिकन संसदेचे मतही अनुकूल नव्हते. ओबामांच्या डेमॉक्रेटिक पक्षाचे सीनेटर आणि काँग्रेसच्या गुप्तचर समितीचे अध्यक्ष डियाने फीनस्टीन यांनी आपल्याला अंधारात ठेवण्यात आल्याची तक्रार केली आहे. टीकाकारांना जाणून घ्यायचे आहे की, पाच वर्षांपूर्वी बोवेच्या शोध कार्यादरम्यान किती अमेरिकन सैनिक मारले गेले होते. मुक्त केलेले तालिबानी भविष्यात किती गोंधळ घालतील, असाही सवाल केला जात आहे. त्यावर ओबामांना स्पष्टीकरण द्यावे लागले आहे.

बोवेवर पळपुटा असल्याचा आरोप आहे. बोवेला मार्च 2009 मध्ये अफगाणिस्तानात तैनात करण्यात आले होते. 30 जूनच्या अध्र्या रात्रीनंतर आपली सर्व हत्यारे सोडून तो पळून गेला. 2 तासांनंतर तालिबान्यांनी रेडिओवर सांगितले की, त्यांनी एका अमेरिकन जवान पकडला आहे. बोवे ज्या चौकीतून पळाला होता, त्याचा प्रभारी सार्जंट इवान ब्युटोचे म्हणणे आहे, रोडिओ संदेशातून स्पष्ट होत आहे की, बोवे तालिबान्यांना जाऊन मिळाला आहे.

बोवेला पकडल्यानंतर तालिबान्यांनी पाच साथीदार सोडण्याची मागणी केली होती. मात्र, सेना आणि गुप्तचर विभागाचे म्हणणे होते की, त्यांना सोडणे भयंकर धोकेदायक सिद्ध होईल. तसे तर पाचही तालिबानी वर्षभर कतारमध्ये सीआयएच्या निगराणीखाली राहतील. बोवेचे परतणे अफगाण युद्ध संपल्याचे संकेत आहेत.