आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिका सर्वात बलाढ्य पण नियंत्रणात नाही; ओबामांची प्रांजळ कबुली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- अमेरिका पृथ्वीतलावरील सर्वात शक्तिशाली,बलाढय़ देश आहे पण जगातील प्रत्येक घडामोडीवर त्याचे नियंत्रण नाही अशी प्रांजळ कबुली शुक्रवारी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी दिली. युक्रेन आणि गाझा पट्टीतील हाताबाहेर गेलेल्या परिस्थितीवरील प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी हे मत व्यक्त केले.

व्हाइट हाऊसमध्ये शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना युक्रेन, गाझाचा संदर्भ देऊन अमेरिके ची पकड ढिली पडत चालली आहे का असा खोचक प्रश्न एका पत्रकाराने ओबामांना विचारला होता.त्यावेळी ते म्हणाले, अमेरिका पृथ्वीतलावरील सर्वात शक्तिशाली देश आहे पण सगळ्याच गोष्टी आपल्या नियंत्रणात नाही हे लोक विसरतात. मुत्सद्देगिरीच्या मार्गाने अमेरिकेचे प्रयत्न सुरू आहेत त्याचा परिणाम हळूहळू दिसेल. मुत्सद्देगिरीत एक पाऊल पुढे गेल्यावर कधी-कधी मागेही हटावे लागते.युक्रेनच्या बंडखोरांना शस्त्रास्त्रे पुरवू नका असे आम्ही पुतीन यांना सांगू शकतो, तरीही त्यांनी ऐकले नाही तर आर्थिक मार्गाने कोंडी क रण्यात आली. विसाव्या शतकात व या शतकाच्या सुरुवातीला अनेक प्रश्नांवर तोडगा काढण्यात अमेरिकेला अपयश आले. परंतु आमचे प्रयत्न सुरूच आहेत.गाझासंदर्भात बोलताना ते म्हणाले,रॉकेट अमेरिकेवर डागले जात नाहीत पण एका जबाबदारीच्या भावनेतून आम्हाला त्याची काळजी वाटतेच.

देशाची अर्थव्यवस्था मजबूत होते आहे असे सांगून या संबंधित आकडेवारीही त्यांनी दिली. रोजगाराच्या संधीमध्ये सलग सहाव्या वर्षी वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले. सन 1997 नंतर प्रथमच एवढय़ा मोठय़ा प्रमाणात रोजगार उपलब्ध झाल्याचे ओबामा म्हणाले.