आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Barack Obama News In Marathi, American President, Divya Marathi

सरकारी दडपशाहीमुळे कृष्णवर्णीयांचा बराक ओबामांवरील विश्वास उडाला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फर्गुसन/वॉशिंग्टन - अमेरिकेच्या मिसौरी प्रांतातील फर्गुसन शहरात कृष्णवर्णीय तरुणाच्या हत्येनंतर उसळलेला हिंसाचार अद्यापही शमलेला नाही. हिंसाचाराला आवर घालण्यासाठी नॅशनल गार्डची तुकडी तैनात करण्यात आली आहे. मात्र सरकारी दडपशाहीमुळे कृष्णवर्णीय नागरिकांचा राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांवरील विश्वासही उडाला आहे. आणीबाणी,संचारबंदी आणि नॅशनल गार्डच्या तैनातीनंतरही हिंसाचार थांबलेला नाही.
दरम्यान, मायकेल ब्राऊन या तरुणावर गोळ्या झाडणारा गोरा पोलिस अधिकारी अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही.सोमवारी रात्रीपासून ते मंगळवार सकाळपर्यंत संतप्त निदर्शकांनी सोडावॉटरच्या बाटल्या,पेट्रोल बॉम्ब पोलिसांवर फेकले.प्रत्युत्तरात पोलिस व इतर सुरक्षा दलांनीही जमावाला काबूत आणण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. नॅशनल गार्डची कडक निगराणी सुरू असून या भागातून विमानांना अधिक उंचीवरून उड्डाण करण्यास सांगण्यात आले आहे.

कृष्णवर्णीय तरुणांच्या हत्येच्या निषधार्थ विविध राज्यांमधून कृष्णवर्णीयांसोबतच श्वेतवर्णीय नागरिकही फर्गुसनला दाखल झाले आहेत.यापैकी 31 जणांना मंगळवारी अटक करण्यात आली. एका व्यक्तिच्या तर 12 पोलिसांनी मुसक्या आवळल्याचे छायाचित्र प्रसिद्ध झाले आहे. आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेचा एक छायाचित्रकार स्कॉट ऑलसन यालाही पोलिसांनी पकडून नेले. परिस्थिती गंभीर असल्याने फ र्गुसन फ्लोरेसेंटच्या सर्व शाळा आणखी आठवडाभर बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मिसौरी चे गव्हर्नर जे.निक्सन,ओबामा आणि संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस बान की मून यांनी लोकांना शांततेचे आवाहन केले आहे.

मुलाचे बलिदान व्यर्थ जाणार नाही : आईचे पत्र
मायकेल ब्राऊन या कृष्णवर्णीय तरुणाच्या हत्येनंतर अमेरिकेत खळबळ उडाली आहे. त्याला एका गो-या पोलिसाने अगदी जवळून सहा गोळ्या झाडल्या होत्या.यापूर्वी 27 फेब्रुवारी 2012 रोजीही ट्रेव्हन मार्टिन नामक एका कृष्णवर्णीय तरुणाची अशाच प्रकारे हत्या करण्यात आली होती. आता या ताज्या घटनेनंतर ट्रेव्हनची आई सिब्रिना फुल्टन हिने मायकेल ब्राऊनच्या आईला पत्र लिहिले आहे. आपल्या मुलांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही.ते (श्वेतवर्णीय ) आपले ऐकत नसतील तर आपणही आपले अस्तित्व दाखवून देऊ.असे या पत्रात म्हटले आहे. ट्रेव्हनवर गोळ्या झाडणारा पोलिस अधिकारी जॉर्ज झिमरमनला न्यायालयाने हत्येबद्दल दोषी ठरवलेले नाही. हे विशेष.