आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय वंशाच्या स्पेलिंग-बींचा ओबामांकडून गौरव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अमेरिकी राष्ट्रपती बराक ओबामा भलेही जगात सर्वांत शक्तिशाली लोकांपैकी एक असतील. मात्र, शब्दांचे स्पेलिंग अचूक सांगण्यात मात्र ते माहीर नाहीत. अत्यंत प्रतिष्ठित आणि कठीण मानल्या जाणाऱ्या ‘स्पेलिंग बी’ स्पर्धेतील मूळ भारतीय वंशाच्या विजेत्यांनी दिलेल्या दोन शब्दांचे स्पेलिंग त्यांना सांगता आले नाहीत.

न्यूयॉर्कस्थित श्रीराम हाथवे (१४)आिण स्पेलिंग बीचा सहविजेता टेक्सास येथील अनसून सुजोय (१५) यांना सोमवारी ओबामांनी व्हाईट हाऊसमध्ये भेटीसाठी बोलावले. त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरू असताना ही भेट घडून आली. दाेघेही माता-िपत्यांसोबत आले होते.
१९६२ मध्ये प्रथमच दरवर्षी होणारी ही स्पर्धा या दोघांत बरोबरीत सुटली.

स्पेलिंग-बींसोबत मजा लुटली
व्हाईट हाऊसच्या बाहेर आल्यानंतर अनसून म्हणाला, राष्ट्रपती खूपच चांगले आहेत. त्यांनी आमच्याशी खूप गप्पा मारल्या. काही ट्रिकही सांिगतल्या. आम्ही दलिेल्या काही शब्दांचे स्पेलिंगही अचूक सांिगतले. त्यांनी मजा म्हणून दोन शब्द दलिे. त्याचे स्पेलिंग आम्हा दोघांना सोडा, ओबामांनाही सांगता आले नाही.श्रीराम म्हणाला, ओबामांनी अगदी विनम्रतेने आमचे स्वागत केले. त्यांची ही भेट म्हणजे आमचा खूप मोठा सन्मान आहे.

पुस्तके दिली भेट
ओबामांनी श्रीराम आणि अनसून यांना आपल्या ‘ड्रीम, बिग ड्रीम’ या पुस्तकाच्या प्रतीही भेट दिल्या.