आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Barack Obama Today Arrive In India, Discussion With Prime Minister Modi

ओबामा आज येणार, ‘ताज’ नाही पाहणार! पंतप्रधान मोदींशी चर्चा करणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: बराक ओबामा पत्नी मिशेलसोबत शनिवार रात्री रवाना झाले.
वॉशिंग्टन/ नवी दिल्ली - अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा रविवारी सकाळी दिल्लीत दाखल होतील. ते शनिवारी सायंकाळी वॉशिंग्टनहून रवाना झाले. परंतु या वेळीही ते ताजमहाल पाहू शकणार नाहीत. २७ जानेवारी रोजीची त्यांची आग्रा भेट रद्द करण्यात आली आहे.

व्हाइट हाऊसच्या निवेदनानुसार, ओबामा पत्नी मिशेलसह आग्र्याऐवजी सौदी अरेबियाला जाणार आहेत. तेथे ते दिवंगत राजे अब्दुल्ला बिन अब्दुल अजीज यांना श्रद्धांजली वाहतील.नवीन राजे सलमान यांच्याशी संबंधही मजबूत करतील. आधी तेथे उपाध्यक्ष जो बिडेन जाणार होते, मात्र ओबामा यांनी स्वत:च जाण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, मिशेल ओबामांसाठी २०० बनारसी साड्यांची भेटही तयार ठेवण्यात आली आहे. सेंट्रल कॉटेज इंडस्ट्रीज कॉर्पोरेशनने त्या खरेदी केल्या आहेत. बराक ओबामांसोबत त्यांचे कॅबिनेट, वजनदार व्यावसायिक नेते आणि अल्पसंख्याक खासदार नॅन्सी पॅलोसीसह अनेक अमेरिकी खासदारही येत आहेत.
पुढे वाचा ऐनवेळी का बदलली आग्रा भेटीची योजना?