आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Barack Obama's Income Has Plummeted Since Becoming President News In Divya Marathi

राष्ट्राध्यक्ष ओबामांची कमाई घटली !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या 2013 मधील कमाई घटल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या पुस्तकाचा खप कमी झाल्याने त्यांना हा फटका बसल्याचे सांगण्यात आले.

ओबामा यांच्या करविषयक कागदपत्रांनुसार मात्र त्यांनी अनेक पटींनी अधिक कर भरला आहे. त्यांनी 2013 मध्ये 4 लाख 81 हजार 98 डॉलरची कमाई केली. 2012 मध्ये त्यांची कमाई 6 लाख 8 हजार डॉलर होती. 2013 मध्ये त्यांनी कमाईवर 20.4 टक्के कर दिला. एक वर्षापूर्वी त्यांनी 18.4 टक्के कर दिला होता. करामध्ये होणारी वाढ त्यांच्या धोरणानुसार आहे, असे बीबीसीच्या वृत्तात म्हटले आहे.

सातत्याने घट !
2009 नंतर ओबामा यांची कमाई सातत्याने घटत आहे. राष्ट्राध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारली त्यावर्षी त्यांचे उत्पन्न 55 लाख डॉलर होते. त्यात ‘ड्रिम्स फ्रॉम माय फादर’ आणि ‘द ऑडेसिटी ऑफ होप’ या पुस्तकांच्या रॉयल्टीचा मोठा वाटा होता.

वेतन किती ?
राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना वार्षिक वेतन चार लाख डॉलर आहे. प्रथम महिला असलेल्या मिशेल यांना 98 हजार डॉलर मिळतात. व्हाइट हाऊसने उपराष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि त्यांची पत्नी जिल यांच्या कमाईचा तपशीलदेखील दिला आहे. त्यांची कमाई 4 लाख 7 हजार डॉलर असून त्यांनी 23.7 टक्के कर भरल्याची माहिती जाहीर केली आहे.

देणगीचा वाटा
राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या पत्नी यांनी एकूण उत्पन्नापैकी 12.3 टक्के एवढी रक्कम गेल्या आर्थिक वर्षात देणगी स्वरूपात दिली आहे. 32 विविध संस्थांना ही मदत देण्यात आली आहे.