आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Barack Obama's Resolution To Bring America It Old Days

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बराक ओबामांचा संकल्प अमेरिके ला पुन्हा समृद्धीच्या वाटेवर आणणे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- राष्ट्राध्यक्षपदाच्या दुस-या कार्यकाळात रोजगार वृद्धी, उच्च शिक्षण, मध्यम असल्याचे संकेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी दिले आहेत. अमेरिकेला समृद्धीच्या वाटेवर पुन्हा नेण्याचा संकल्प त्यांनी सोडला आहे.
मंगळवारी रात्री संसदेच्या संयुक्त अधिवेशनात ओबामा यांनी आपल्या दुस-या कारकिर्दीत प्रथमच राष्ट्राला उद्देशून भाषण (‘स्टेट ऑफ युनियन स्पीच ’) केले. याप्रसंगी त्यांनी आपल्या योजनांबद्दल माहिती दिली. मध्यमवर्ग हा अमेरिकेच्या विकासाचे इंजिन आहे. त्याचा पुन्हा वेगाने विकास केला पाहिजे.असे सांगून खराब रस्ते आणि पूलांच्या डागडुजीसाठी व नव्या रोजगार निर्मीतीसाठी 50 अब्ज डॉलर्सचा निधी राखून ठेवला असून किमान वेतन 7.25 डॉलरवरुन 9 डॉलरवर हवे असे ते म्हणाले.

गन कंट्रोलवर गहिवरले
तासभराच्या भाषणात ओबामा बंदूक नियंत्रण कायद्याचा विषय निघताच गहिवरले. शस्रास्रांवर बंदी आणि बंदूक नियंत्रण कायदा लवकर मंजूर करा, असे आवाहन त्यांनी सिनेटर्स व काँग्रेस सदस्यांना केले. नागरिकांचे आयुष्य पणाला लागले आहे. असे सांगून न्यू टाऊन, ऑरोरा, ओक क्रीक, टस्कन आदी ठिकाणच्या हत्याकांडाची त्यांनी आठवण करुन दिली.

खास पाहुणे
* न्यू टाऊन (कनेक्टिकट) येथील गोळीबारात जखमी झालेली मुले, मृत्युमुखी पडलेल्या हादीया पेंडेल्टनचे आई-वडील यांची खास उपस्थिती होती.हादीया ओबामांच्या शपथविधी समारंभातील कार्यक्रमात सहभागी झाली होती. नंतर तिची हत्या झाली.
* सायबर सुरक्षा : ओबामांनी सायबर सुरक्षेसाठी नवीन अध्यादेश जारी केला. राष्ट्रीय सुरक्षा, नोक-या आणि व्यक्तिगत, खासगी आयुष्यावर होणा-या हल्ले या आदेशामुळे टाळता येतील, असे ते म्हणाले.
* पुढील वर्षापर्यंत अफगाणिस्तानमधून 34 हजार अमेरिकी सैनिक मायदेशी परत येतील अशी घोषणाही त्यांनी केली.

सध्या तिथे 66 हजार सैनिक आहेत.
किमान वेतन ताशी 483 रुपये हवे

आर्थिक प्रस्तावांबाबत बोलताना त्यांनी किमान वेतन प्रति तास 7.25 डॉलरवरुन (सुमारे 390 रुपये) 9 डॉलर (सुमारे 483 रुपये) हवे असे सांगितले. त्याचबरोबर पायाभूत विकास, उत्पादन क्षेत्रात वाढ, विज्ञान, गणित आणि शिक्षण क्षेत्रात सुधारणा व वैकल्पिक ऊर्जा स्रोतांमध्ये विकास गरजेचा असल्याचे ते म्हणाले.