आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ओबामा झोपले चक्क व्हरांड्यात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- अमेरिकन राष्ट्रपती बराक ओबामा यांची आत्मकथा 'बराक ओबामा : द स्टोरी' या पुस्तकाची 19 जूनपासून विक्री सुरू होणार आहे. लेखक डेव्हीड मॅरानिस यांचे हे पुस्तक आतापासूनच चर्चेत असून त्याबाबत अमेरिकन वाचकांमध्ये प्रचंड उत्सूकता दिसून येत आहे. या पुस्तकात त्यांनी ओबामांच्या आयुष्यातील अनेक अप्रकाशित पैलू प्रथमच जगासमोर आणले आहेत. या पुस्तकातील काही अंश आधीच प्रकाशित झाले आहेत. यात त्यांची आधीची मैत्रिण, सिगारेट पिण्याचे किस्से तसेच ओबामांशी निगडीत काही रंजक बाबींचा समावेश आहेत.

कोंबडीने चोच मारली : बराक ओबामा आपल्या रूममेटच्या एक आठवडा आधी न्यूयॉर्कला आले होते. ते जेव्हा 109 स्ट्रीटला पोहोचले तेव्हा त्यांच्याकडे अपार्टमेंटची चावी नव्हती. त्यामुळे एवढय़ा मोठय़ा शहरात त्यांना पहिल्या रात्री गल्लीत एका रस्त्यावरच झोपावे लागले होते. सकाळी उठल्यानंतर पाहिले तर एक कोंबडी त्यांच्या चेहर्‍यावर चोचा मारत होती.

टोपी आणि सिगारेटची स्टाइल

कॉलेजच्या दिवसांत ओबामांना हॅट घालणे आवडत होते. अनेकदा ते कॉलेजमधे टोपी घालून येत होते, अशी माहिती त्यांच्या मार्क पार्सन्स या मित्राने दिली आहे. त्यांच्या मित्राने दिलेल्या माहितीनुसार कॉलेजच्या काळातील ओबामांची सिगारेट पिण्याची स्टाइल अतिशय वेगळी होती. मनगट वर उचलून बोट व तर्जनीच्या मध्ये सिगारेट पकडून ते स्टाइलमध्ये झुरके घेत असत. लग्नानंतर सिगारेट सोडण्याची इच्छा त्यांनी अनेकदा व्यक्त केली होती. अशा प्रकारचे अनेक किस्से डेव्हिड मॅरानिस यांच्या पुस्तका मांडण्यात आली आहेत. त्यात काही खासगी बाबींचाही समावेश आहे.