आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बार्बी नार नख-याची!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- बालपण आणि बार्बी डॉल यांचे वर्षानुवर्षांचे नाते. मुलींच्या भावविश्वाशी जोडल्या गेलेल्या बार्बीचा नवा अवतार बाजारात येण्यासाठी सज्ज झाला आहे. लहान मुलांना आवडणारी ही बाहुली आता पुरुषांनाही भुलवणार आहे. तिचे रूप अर्थातच अधिक ग्लॅमरस झाले आहे.
या बाहुलीला ब्लाँड डायमंड बार्बी असे नाव देण्यात आले आहे, असे डेली मेलच्या वृत्तात म्हटले आहे. तिचे लाँचिंग शुक्रवारी करण्यात आले. फॅशन हे स्वभावना व्यक्त करण्याचे एक माध्यम आहे. प्रत्येक दिवशी ग्लॅमरस फील करायला प्रत्येकाला आवडते, यावर आपला विश्वास असल्याचे डिझायनर फिलीप ब्लाँड यांनी म्हटले आहे. त्याचे प्रतिबिंब या बाहुलीच्या रचनेतून दिसते.
नव्या बार्बीचे नवे नखरे..- सोनेरी रंगाची साइड स्वेप्ट केशरचना बार्बीला पाहताच क्षणी नवा लूक देणारी आहे. मिनी कॉरसेट ड्रेस तिला आणखी ग्लॅमर देणारा आहे. संपूर्ण अंगावरील कोट, चंदेरी रंगातील अ‍ॅक्सेसरीज, कॉकटेल अंगठी, गुलाबी लिपस्टिक, निळ्या डोळ्यांची मोठी हालचाल तिला ड्रॅग क्वीन ठरवणारे आहेत.
ड्रेसरची कल्पना - न्यूयॉर्कमधील फॅशन डिझायनर फिलीप ब्लाँड यांच्या कल्पनेतून बार्बीला हे नवे रुपडे मिळाले आहे. ब्लाँड यांनी ही बाहुली तयार केल्यामुळे ती ऑफिशियली ब्लाँड्स ब्लाँड डायमंड असे म्हटले जात आहे. या कामात त्यांना डेव्हिड ब्लाँड यांचीही मदत मिळाली.