आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिरियात चौफेर मृतदेहाचा सडा अन् लाईफस्टाईल एन्जॉय करणारी राष्‍ट्राध्यक्षांची पत्नी!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिरियामधील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असताना तीन दिवस सलग हल्ला करण्‍याचे अमेरिकेचे अनियोजन आहे. एका बाजून मृतदेहाचे ढिग लागले असताना दुसरीकडे राष्‍ट्राध्यक्ष बशर अल असद यांची पत्नी असमा अल असद दमिश्कमध्ये एका बॉम्बप्रुफ बंकरीत ऐशोआरामात राहत आहे. विशेष म्हणजे राष्ट्रातील जनतेवर विषारी वायूचे हल्ले होत असताना असमा अल असद महागड्या लाईफस्टाईल एन्जॉय करत असल्याचे एका ब्रिटिश न्यू वेबसाईटने म्हटले आहे. वेबसाईटच्या अहवालानुसार, असमा ही पूर्णपणे बेफिकीरपणे जीवन जगत आहे. महागडे दा‍गिने, फर्नीचर आणि वेस्टर्न ड्रेसेसवर बेसुमार खर्चही करत आहे.

असमा असद सध्या दमिश्कमध्ये एका खास बंकरमध्ये आपल्या कुटुंबियांसोबत राहत आहे. असमा हिला देशातील जनतपेक्षा स्वत:च्या नट्टापट्टांची जास्त चिंता आहे. विशेष म्हणजे देशात हजारो चिमुरडे आणि महिलांच्या मृतदेहाचा सडा पडला असताना राष्ट्राध्यक्षाची पत्नी शॉपिंग करण्यात व्यग्र आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी असमा हिने लंडन येथील तिचे एक छायाचित्र पोस्ट केले होते. त्यात तिने घातलेले दागिने ती दाखवत आहे.

पुढील स्लाईड्‍सवर क्लिक करून पाहा, बेफिकीर असमाची लॅव्हिश लाइफस्टाईल...