आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॅटमनच्या गाडीची 22 कोटी 60 लाखांत विक्री

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- लोकप्रिय बॅटमन टीव्ही मालिकेत एकदम सुरुवातीला वापरण्यात आलेली कार एका लिलावात विकण्यात आली. या गाडीला 22 कोटी 60 लाख 93 हजार रुपये किंमत मिळाली आहे. बॅटमोबाइल असे या गाडीचे नाव आहे. कॉमिक बुकमधील हीरो बॅटमन या गाडीचा वापर करतो असे दाखवण्यात आले आहे. अभिनेता अ‍ॅडम वॅस्टने ही गाडी वापरली होती. बॅटमोबाइलची खरेदी अ‍ॅरिझोनामधील फिनिक्स शहरातील नागरिक रिक शँपेन यांनी केली आहे. बॅटमोबाइल गाडीची रचना लिंकन फ्युचुरा गाडीशी साधर्म्य राखणारे आहे. 1955 मध्ये तयार करण्यात आलेल्या फ्युचुरा आणि बॅटमोबाइल यांच्यात फारसे अंतर दिसत नाही. 1965 मध्ये जॉर्ज बॅरिस यांनी फ्युचुराला खरेदी केले आणि तिचे रूपांतर पंधरा दिवसांत बॅटमनच्या गाडीत केले. त्यावेळी त्यांना 80 हजार रुपये एवढा खर्च आला होता. त्यानंतर बॅटमोबाइल विक्रीसाठी बाजारपेठेत येण्याची ही दुसरीच वेळ आहे.

प्रसिद्धी शिखरावर
1966 मध्ये पाश्चात्त्य जगतात टीव्हीवरील ही मालिका तुफान लोकप्रिय ठरली होती.
काय वैशिष्ट्ये
व्ही 8 इंजिन. कार फोन आणि पॅराशूटच्या व्यवस्थेसह अनेक प्रकारच्या गॅझेट्सचा समावेश.
अमेरिकेत भ्रमंती
1968 मध्ये बॅटमन ही टीव्ही सिरीज रद्द करण्यात आली होती. त्यानंतर जॉर्ज बॅरिसने ही गाडी अमेरिकेत ठिकठिकाणी नेली होती. शेवटी तिला एका खासगी शो रूममध्ये ठेवण्यात आले. अभिनेता अ‍ॅडम वॅस्टने 120 मालिकेत बॅटमनची भूमिका निभावली आहे. त्याच्या अभिनयाने रसिकांवर गारूड केले होते. त्यानंतरही या कॉमिक हीरोवर अनेक टीव्ही मालिका आणि चित्रपट तयार झाले. त्यात मायकल किटन,वॅल किलमर, जॉर्ज क्लूनी आणि क्रिस्टियन बेलसारखे कलाकार सहभागी होते.