आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीबीसी वर्ल्डचे प्रसिद्ध अँकर कोमला ड्युमोर यांचे निधन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - बीबीसी टीव्हीचे प्रसिद्ध अँकर कोमला ड्युमोर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते 41 वर्षांचे होते. बीबीसी वर्ल्ड न्यूज आणि फोकस ऑन आफ्रिका या कार्यक्रमाशी ते निगडित होते. कृष्णवर्णीय नेते नेल्सन मंडेला यांच्या निधनानंतर त्यांनी केलेले वार्तांकनाची जगभरात प्रशंसा झाली होती.


कोमला यांचा जन्म घानाची राजधानी अकरामध्ये 3 ऑक्टोबर 1972 रोजी झाला होता. त्यांनी युनिव्हर्सिटी घानामध्ये समाजशास्त्र आणि मानसशास्त्रात पदवी शिक्षण पूर्ण केले होते. साधारण दहा वर्षे घानामध्ये पत्रकारिता केल्यानंतर ते 2007 मध्ये बीबीसीत दाखल झाले. त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना बीबीसी ग्लोबल न्यूजचे संचालक पीटर होरॉक्स म्हणाले, कोमला आफ्रिकी पत्रकारितेचा तेज:पुंज प्रकाश होता. त्यांची उणीव जाणवत राहील. कोमलांच्या निधनाची बातमी त्यांचे मित्र आणि जगभरातील चाहत्यांसाठी धक्का आहे.