आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Be Aleart ! Photo Sharing May Be Expensive On Facebook

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सावधान! फेसबुकवर फोटो शेअर कराल, तर नातेसंबंध बिघडतील

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - आयुष्यातील प्रत्येक घडामोडीचे फोटो फेसबुकवर शेअर करण्याची सवय अनेकांना असते. परंतु तशी सवय असेल तर या सवयीला वेळीच आवर घाला. कारण त्यामुळे तुमचे नातेसंबंध बिघडू शकतात, असा इशारा संशोधकांनी दिला आहे.


नातेसंबंधातील खासगी क्षणांना टिपणारे फोटो सहसा टाकणे शिष्टसंमत ठरत नाही. परंतु अनेकांना असे फोटो फेसबुकवर अपलोड करण्यात काहीही गैर वाटत नाही. मात्र त्यांची ही कृती अत्यंत जवळच्या संबंधात वितुष्ट येण्यासाठी पुरेशी ठरते, असा दावा बर्मिंगहम विद्यापीठ व एडिनबरा विद्यापीठाच्या संशोधकांनी केला आहे. सातत्याने अशा प्रकारची कृती नाते नासवू शकते, असे डॉ. डेव्हिड हॉग्टन यांनी म्हटले आहे. ते बर्मिंगहम बिझनेस स्कूलमध्ये प्राध्यापक आहेत. आपण मित्र या शीर्षकाखाली एखादी माहिती पोस्ट करतो. तेव्हा ही माहिती त्या विभागातील असंख्य लोकांना पाहता किंवा वाचता येऊ शकते.