आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमानामध्ये लिव्हिंग रूम, बेडरूम, बाथरूम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अबुधाबी - इएत्तिहाद एअरवेज आपल्या श्रीमंत प्रवाशांसाठी नवी मिनिएचर स्यूट योजना सादर करत आहे. त्यानुसार प्रवासी विमानातील 11.61 स्क्वेअर मीटरचा स्यूट बुक करू शकतील. त्यात लिव्हिंग रूम, बेडरूम आणि बाथरूम असेल. शिवाय प्रायव्हेट बटलर सेवाही मिळू शकतील. डिसेंबरपासून कंपनी ही सेवा देत असून, त्याचे भाडे 2100 डॉलर म्हणजे सुमारे 12.63 लाख रुपये असेल. इत्तिहादची स्पर्धक कंपनी अमिरात एअरवेज आपल्या डबलडेकर ए 380 विमानांत आपल्या प्रवाशांना ऑन बोर्ड शॉवरची सुविधा उपलब्ध करून देत आहे.
आणखी सुविधा अशा : इत्तिहाद एअरवेजने रविवारी हॉटेलस्टाइलच्या या मिनएचर स्यूटचे मॉडेल दाखवले. ए 380 विमानात कंपनी मोबाइल आणि वायफाय सेवाही पुरवणार आहे. स्यूटमध्ये फूल लेन्थ बेड, मिनी बार, व्हॅनिटी युनिट, वॉर्डरोब, लाऊंज सीटही असेल. बेस्ट साऊंड क्वालिटीसाठी नॉइज कॅन्सलिंग हँडसेटही असतील. इत्तिहाद कंपनी बी 787 विमानातही नवे लक्झरी फिचर लाँच करणार आहे.