आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रपित्याचा अपमान: अमेरिकन कंपनी गांधीजींच्या नावावर विकत आहे बीयर!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क- राष्ट्रपिता महात्मा गांधी बीयर कंपनीचे ब्रॅंड एम्बेसडर! होय, अमेरिकेतील एका बीयर कंपनीने असाच कारनामा केला आहे. ही कंपनी महात्मा गांधी यांचे नाव व स्केच वापरून बीयर विकत आहे. या प्रकरामुळे भारतीय लोकांनी नाराजी व्यक्त केली असून, कंपनीने माफी मागावी अशी मागणी केली आहे.

हैदराबादचे वकील जनार्दन रेड्डी यांनी कंपनीच्या विरोधात कोर्टात याचिका दाखल केली आहे. न्यू इंग्लंड ब्रूइंग कंपनीने या बीयरला ‘गांधी-बॉट’ असे नाव दिले आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने आपल्या साईटवर लिहले आहे की ही बीयर वेजिटेरियन (शाकाहारी) आहे. आत्म शुद्धिकरण, सत्य आणि प्रेम शोधणा-यांसाठी ही बीयर आदर्श आहे असे कंपनीने आपल्या जाहीरातीत म्हटले आहे.