आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Begger Become Billionair Because Of Honesty In America

अमेरिकेतील भिकारी प्रामाणिकपणामुळे बनला कोट्यधीश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - अमेरिकेतील कंसास सिटीमध्ये राहणार्‍या बिली रे हॅरिस नामक भिकार्‍याचे जीवन त्याच्या प्रामाणिकपणामुळे पालटले आहे. कधी काळी भीक मागून रस्त्यावर गुजराण करणारे बिली आता करोडपती बनले असून चांगल्या घरात राहत आहेत. एका महिलेची एंगेजमेंट रिंग परत केल्याचे बक्षीस म्हणून त्यांना सुमारे 1.25 कोटी रुपये मिळाले.

यावर्षी फेब्रुवारी महिन्यात बिली कंसास सिटीमध्ये भीक मागत होते. त्यावेळी सारा डार्लिंग नामक एका महिलेने त्यांच्या कटोर्‍यात पैसे टाकले परंतु त्यासोबत त्यांच्या बोटातील अंगठीही चुकून कटोर्‍यात पडली. त्या अंगठीची किंमत सुमारे 2 लाख 60 हजार होती. अंगठी मिळाल्याने आनंदी झालेल्या बिलीने अंगठी विकण्याचा विचार केला. परंतु ती विकण्यासाठी त्याची हिंमत होऊ शकली नाही. दुसर्‍या दिवशी त्यांनी साराचा शोध घेऊन त्यांना ती अंगठी परत केली. बिलीच्या प्रामाणिकपणामुळे सारा आणि त्यांचे पति भारावले. त्यांनी बिलीला मदत करण्याच्या उद्देशाने निधी गोळा करण्याचा निर्धार केला. तीन महिन्यांत त्यांनी 1 लाख 90 हजार डॉलरची राशी गोळा केली आणि ती बिलीला दिली. प्रामाणिकपणाच्या मोबदल्यात मिळालेली ही रक्कम पाहून बिलीलाही आनंद झाला. आता ते नव्या जीवनाची सुरुवात करत आहेत.


माध्यमातील प्रसिद्धीमुळे नातेवाईकही मिळाले
हॅरिस रे बिली यांना प्रामाणिकपणाच्या बदल्यात मिळालेल्या राशीमुळे ते माध्यमात खूप प्रसिद्ध झाले. येथील स्थानिक मीडियामध्ये ते प्रचंड गाजले. माध्यमांतील या चर्चेमुळेच त्यांचे नातेवाईक सुमारे 16 वर्षांनंतर बिलीला येऊन भेटले. प्रामाणिकपणाच्या बदल्यात मिळालेल्या राशीमधून बिली यांनी एक घर आणि कार विकत घेतली आहे. आता या घरात अन्य सोयीसुविधा आणि सजावटीच्या कामात गुंतले आहेत.