आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेगम खालिदा झिया नजरकैदेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ढाका-बांगलादेशमध्ये येत्या वर्षात होणा-या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लष्कर तैनात करण्यात आले आहे. विरोधी पक्षनेत्या खालिदा झिया यांना त्यांच्या घरात नजरकैद करण्यात आले आहे. झिया यांचा पक्ष आणि मुख्य विरोधी पक्ष बीएनपीच्या कार्यकर्त्यांनी खालिदा यांना भेट दिली जात नसल्याचा आरोप केला आहे. खालिदा यांनी रविवारी ढाक्यामध्ये निवडणुकीला विरोध करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले होते. त्यामुळे त्यांना नजरकैदेत टाकण्यात आल्याचे मानले जाते.
बीएनपीव्यतिरिक्त अन्य 21 पक्षांनी निवडणुकीला विरोध केला आहे. ढाक्याचे पोलिस उपायुक्त लत्पुल कबीर यांनी खालिदा यांच्या नजरकैदेस दुजोरा दिला आहे. मात्र, त्यांनी कोणालाही भेटू दिले जात नसल्याच्या आरोपाचा इन्कार केला.
बांगलादेशमध्ये जानेवारीपासून आतापर्यंत उसळलेल्या हिंसाचारात 269 लोकांचा मृत्यू झाला आहे. रविवारच्या सभेमुळे तणाव आणखी वाढू शकतो, अशी भीती पोलिसांनी व्यक्त केली आहे. देशातील 64 पैकी 59 जिल्ह्यांमध्ये लष्कर तैनात करण्यात आले असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले.