आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Behind The Scenes In Putin Routine News In Marathi

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन दररोज उठतात उशीरा आणि खातात बटेर पक्ष्याची अंडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- न्युजविकच्या ताजा अंकाचे कव्हर)
नवी दिल्ली- अमेरिकेचे साप्ताहिक न्युजविकने रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्यावर कव्हर स्टोरी प्रकाशित केली आहे. यात पुतीन यांच्या दैनंदिन आयुष्याशी निगडित रंजक माहिती देण्यात आली आहे. तर चला जाणून घेऊयात पुतीन यांच्या खासगी आणि दैनंदिन आयुष्याविषयी...
सकाळची सुरवात
पुतीन सकाळी उशीरा उठतात. त्यानंतर दुपारीच काही खातात. त्यांना नाश्त्यात कॉटेज चीज, ऑम्लेट आणि पोरिज (चीजचा एक प्रकार) लागले. त्यांना बटेर पक्ष्याची अंडी आणि ज्युस घेणे आवडते. पतीन यांना ताजे अन्न मिळावे, यावर विशेष भर दिला जातो. रशियाचे धार्मिक नेते पॅर्टियार्च क्रिल यांच्या शेतातील ताजी फळे पुतीन यांच्यासाठी नियमितपणे पाठविली जातात. जरा लाईट ब्रेकफास्ट घेतल्यावर पुतीन कॉफी घेतात. त्यानंतर ते स्विमिंग करतात. त्यांना यावेळी पुलमध्ये एकटे राहणे आवडते. यावेळी पुतीन देशाच्या राजकीय परिस्ठितीवर विचार करतात, असे त्यांचे राजकीय सल्लागार सांगतात. यानंतर ते जिमला जातात. येथे रशियाचे सगळे चॅनल ते बघतात. स्विमिंग करीत असेल तेव्हा कुणी डिस्टर्ब केलेले पुतीन यांना आवडत नाही. त्यांची भेट घेण्यासाठी तीन ते चार तासांची प्रतिक्षा करणे अगदी साधारण बाब आहे.
पुढील स्लाईडवर वाचा, गुप्तहेर खात्याकडून मिळणाऱ्या तीन अहवालांबद्दल...