बेलारुसमध्ये इव्हान कुपाला महोत्सव रविवारी ( ता. 6) संपले. ती साजरा करण्याची प्राचीन परंपरा आहे. बेलारूससह रशिया आणि युक्रेन या देशातही कुपाला महोत्सव साजरा केला जातो. बेलारुसच्या पारंपरिक वेशभूषा करून तरुण-तरुणी आणि आबालवृद्ध लाकडाच्या पेटत्या होळीवरून उड्या मारतात. बेलारुसची राजधानी मिंस्कपासून 260 किलोमीटर अंतरावर असलेल्या तुराव्ह शहरात कुपाला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. रोगराई होऊ नये आणि कोणतेही अरिष्ट मागे लागू नये म्हणून लोक रात्रभर पेटत्या होळीवरून उड्या मारतात.
काय असतो कुपाला?
कुपाला म्हणजे अग्निस्नान. अग्निस्नानासाठी पेटत्या होळीवरून रात्रभर उड्या मारणा-यांची प्रथा तरुण-तरुणींमध्येच जास्त लोकप्रिय असल्याने अनेकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. परिणामी ही प्रथा बंद करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
पुढे पाहा इव्हान कुपाला महोत्सवाची छायाचित्रे....