पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांच्या निधनाला आज पाच वर्षे पूर्ण झाली. त्यांनी आणि त्यांचे पती असिफ अली झरदारी यांनी 1995 मध्ये व्हिटेल या गावी खरेदी केलेल्या रॉकवूड हाऊसच्या रात्री सध्या रंगीत असतात. 365 एकर परिसरात पसरलेल्या या या हवेलीचा उपयोग सध्या सेक्स आणि रेव्ह पार्टीसाठी केला जात आहे. वास्तविक भुत्तो आणि त्यांच्या कुटुंबाने 2004 मध्ये 4 मिलिउन पाउंडात या हवेलीची विक्री केली होती. डिसेंबर 2007 मध्ये पाकिस्तानच्या निवडणूक रॅली दरम्यान बेनझीर भुत्तों यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, आज जिथे सेक्स पार्ट्यांचे आयोजन केले जात आहे, तिथे कधीकाळी जगातील मातब्बर नेते भुत्तोंशी गंभीर चर्चा करण्यासाठी येत होते.
रॉकवूड हाऊस नावाने प्रसिद्ध या हवेलीत 15 बेडरुम आहेत. बेनझीर आणि त्यांच्या पतीने 1995 मध्ये हवेली खरेदी केली होती. त्यांनी 2004 मध्ये हवेलीची विक्री केल्यानंतर आता पुन्हा हवेली विक्रीसाठी निघाली आहे. त्यामुळे येथे सुरू असलेल्या रंगित-संगित पार्ट्यांचे बिंग फुटले आहे. वेबसाइटवर दिलेल्या जाहिरातीत येथील सिक्रेट पार्ट्यांचा खुलासा करण्यात आला आहे.
भुत्तोंनी विक्री केल्यानंतर नव्या मालकाने हवेली सेक्स पार्ट्यांसाठी किरायाने देण्यास सुरवात केली. वाइफ स्वॅपिंग आणि इरोटिक डान्सच्या चाहत्यांसाठी ही हवेली प्रथम पसंत ठरत आहे. लिटिल लायसन्स कंपनीकडून येथे विकेंड पार्टी आयोजित केली जाते. त्यसाठी 450 पाउंड शुल्क आकारले जाते. गेल्या महिन्यात येथे 'मिनी फेस्टिव्हल ऑफ सिन' आयोजित करण्यात आला होता.
पुढील स्लाइडमध्ये, काय आहे मिनी फेस्टिव्हल ऑफ सिन...