आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Benazir Bhutto: Oxford Party Girl Cursed By Blood Soaked Family Dynast

बिनधास्त मुलगी ते पाकिस्तानच्या पंतप्रधान पदापर्यंत... एक होती बेनझीर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगातील मातब्बर महिला नेत्यांपैकी एक बेनझीर भुत्तो यांच्या हत्येला आज पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. असेच थंडीचे दिवस होते. निवडणूक प्रचारासाठी भर दुपारी रावळपिंडी येथे रॅली करत असलेल्या 54 वर्षीय बेनझीर यांच्यावर गोळीबार करण्यात आला आणि त्यांचा आवाज शांत केला गेला.
पाकिस्तानमधील सर्वात मोठे राजकीय घराणे भुत्तो यांच्या घरात बेनझीर यांचा जन्म झाला. त्यांचे वडील झुल्फिकार अली भुत्तो पाकिस्तानचे माजी पंतप्रधान होते. त्या 1988 ते 90 आणि 1993 ते 96 दरम्यान पाकिस्तानच्या पंतप्रधान होत्या. 2007 मध्ये जेव्हा पाकिस्तानमधील लष्कराची ताकद कमकुवत होत होती आणि देशातील लोकशाही देखील मृत्यूपंथाला लागण्याची चिन्हे होती तेव्हा नऊ वर्षांच्या विजनवासानंतर त्या पाकिस्तानात परतल्या होत्या. तेव्हा पाकिस्तानमध्ये परवेझ मुशर्रफ यांचे सरकार होते. मुशर्रफ सरकारने त्यांना मायदेशात परतण्याची परवानगी दिली आणि त्यासोबतच जीविताला धोका असण्याचा इशारा देखील दिला होता. बेनझीर दुबईहून कराचीसाठी निघाल्या तेव्हा म्हणाल्या होत्या, 'सर्वात मोठी सुरक्षा 'खुदा'ची आहे. त्याने जर ठरविले तर सर्वकाही व्यवस्थित होईल.'
पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या बेनझीर भुत्तोंद्दल...