साओ पावलो - जगात अनेक विषारी साप आहेत. जी क्षणात कोणाचाही जीव घेतात. अशाच अनेक विषारी सापांचे ठिकाण ब्राझीलच्या साओ पावलोच्या समुद्र किना-यापासून 32 किमी दूर समुद्राच्या मधोमध असलेल्या इल्हा डी क्वेमाडा ग्रँड बेटावर आहे. या बेटाला 'स्नेक आयसलँड' या नावानेही ओळखले जाते.ब्राझील सरकारने लोकांना क्वेमाडा ग्रँडवर जाण्यास बंदी घातली आहे. कारण येथे 4 हजार इतक्या वेगवेगळ्या सापांच्या प्रजाती आढळतात. त्यांच्या विषाने कोणाचेही जीव जाऊ शकते. या बेटावर अशी अनेक जीवघेणारी आणि विषारी साप आहेत,जी हवेत उडून पक्ष्यांचा शिकार करतात. या सापांचे विष हे जगातील इतर देशातील सापांपेक्षा पाच पटीने विषारी आहेत.
बेटावर जाण्यास बंदी केल्यापासून येथे लोक फिरकलेही नाहीत. येथे सर्वात विषारी साप सोनेरी रंगाचा गोल्डन लांसहेड वाइपर ( सोनेरी डोक असलेला साप) आहे. जो फक्त ग्रँड बेटावरच सापडतो. जाण्यास बंदी असली तरीही, सापांवर संशोधन करण्यासाठी शास्त्रज्ञ सरकारकडून परवानगी घेऊन बेटावर जातात.
पुढील स्लाइड्सवर पाहा गोल्डन वाइपर आणि या बेटाची काही छायाचित्रे....