आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bhagat Singh Not Named In FIR For Saunders\' Murder

एफआयआरमध्ये नाव नसतानाही भगतसिंगांना फाशी, साक्षीही नोंदवल्या नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लाहोर - पोलिस अधिकारी जॉन. पी. सँडर्स यांच्या हत्येनंतर दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये शहीद भगतसिंग यांचे नावच नव्हते. पाकिस्तानच्या पोलिस विभागातर्फे ही माहिती देण्यात आली आहे.
याप्रकरणी दाखल करण्यात आलेली पोलिस तक्रार पोलिसांनी शोधून काढली आहे. ही तक्रार उर्दू भाषेत नोंदवण्यात आली आहे. अनारकली ठाण्यामध्ये 17 डिसेंबर 1928 रोजी सायंकाळी 4:30 वाजता ही तक्रार दाकल करून घेण्यात आली होती. यात दोन अज्ञात व्यक्तींचा असा उल्लेख करण्यात आला होता.

पोलिस ठाण्यातील एक पोलिस अधिकारीच या प्रकरणी प्रत्यक्ष साक्षीदार होता. ज्या व्यक्तीचा त्याने पाठलाग केला तो पाच फूट पाच इंच उंचीचा होता. त्याच्या लहान मिशा आणि सडपातळ देहयष्टी असल्याचे त्याने सांगितले होते. त्याने पांढरा पाययमा आणि भुरक्या रंगाचा सदरा तसेच काळ्या रंगाची टोपी घातलेली होती, अशा प्रकारचे वर्णन या साक्षीदार पोलिसाने व्यक्त केले होते.
भगतसिंग मेमोरियल फाऊंडेशनचे अध्यक्ष इम्तियाज राशीद कुरेशी यांनी एक याचिका दाखल केली होती. त्यात भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्याविरोधात सँडर्स यांच्या हत्येप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या तक्रारीची प्रत मागवली होती.

भगतसिंग यांच्या खटल्याची कामगिरी पाहणार्या विशेष न्यायाधीशाने 450 साक्षीदारांचा जबाब न नोंदवताच या तिघांना फाशीची शिक्षा सुनावली होती. भगतसिंह यांच्या वकिलाला युक्तीवाद करण्याची संधीही देण्यात आली नाही, असा आरोप तक्रारीची प्रत मिळाल्यानंतर कुरेशी यांनी केला.