आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bhaskar Gyan, This Things Will Be Change The World

या कल्पना करतील जीवन सरस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ते नवीन संविधानाप्रमाणे विशाल असू शकतील किंवा एखाद्या मेडिकल मायक्रोचिपप्रमाणे छोटेही असू शकतील. हे असे आविष्कार आहेत, जे आपल्या जीवनाला सुविधायुक्त, आरामशीर आणि सोपे बनवण्यास सक्षम आहेत. ते काम करण्याच्या पद्धती, राहणीमान, करमणूक, खाण्या-पिण्यासह मानवी जीवनाच्या विविध पैलूंना प्रभावित करतील.

लॅबमध्ये तयार होईल मांस ( ब्रायन वॉल्श) - माजी ब्रिटिश पंतप्रधान विस्टन चर्चिल यांनी 1931 मध्ये म्हटले होते, पन्नास वर्षांनंतर आपल्याला कोंबड्याची छाती किंवा पंखांच्या भागाला खाण्यासाठी पूर्ण कोंबडी जन्माला घालण्याची गरज पडणार नाही. उपयुक्त वातावरणात आपण या भागाची वेगवेगळी निर्मिती करू शकू. चर्चिल राजकीय नेते होते, शास्त्रज्ञ नाही. परंतु 82 वर्षांनंतरही मांसाचे मुख्य स्रोत प्राणीच आहेत. परंतु आता शास्त्रज्ञ खाण्यायोग्य मांस प्रयोगशाळेत तयार करण्याच्या दिशेने खूपच पुढे गेले आहेत. प्राण्यांच्या पेशींतून काढण्यात आलेल्या मांसरज्जूतून प्रयोगशाळेत हे मांस तयार करणे मांस उत्पादनाच्या सध्याच्या पद्धतीच्या तुलनेच्या अनेक प्रकरणांत उत्तम आहे. एका शक्यतेनुसार, यात 45 टक्के कमी प्रमाणात ऊर्जेचा वापर केला जाईल. ‘पीपल्स फॉर द एथिकल ट्रीटमेंट आॅफ अ‍ॅनिमल्स’ने प्रयोगशाळेत तयार करण्यात आलेल्या मांसाचे मोठ्या प्रमाणावर विपणन करणा-यांना 10 लाख डॉलरचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. दुसरीकडे, नेदरलॅँडमध्ये मासट्रिच्ट विद्यापीठाचे फिजिओलॉजिस्ट मार्क पोस्ट आणि त्यांच्या टीमने प्रयोगशाळेत कमी प्रमाणात मांसाची निर्मिती केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, ते काही महिन्यांमध्ये पहिले इन विट्रो बर्गर तयार करतील.

छोटी आणि स्वस्त घरे (नेट रॉलिग्स) - शहरं मोठी असोत किंवा छोटी, निवासाची समस्या प्रत्येक ठिकाणीच आहे. शहरात निवासाची जागा संकुचित होत आहे. घरांचे भाडे गगनाला भिडत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी अनेक अमेरिकी शहरांत मायक्रो अपार्टमेंट तयार करण्याची सुरुवात झाली आहे. नवीन युनिट 400 वर्गफुटात तयार होऊ शकतात. या अपार्टमेंट अधिक जागेचा अनुभव देतील. मागील वर्षात सॅनफ्रान्सिस्कोच्या मायक्रोकॉम्प्लेक्समध्ये सुरू झालेल्या एका स्टुडिओचे छत खूपच उंच ठेवण्यात आले आहे. यात फोल्डिंग पलंग आणि टेबल आहेत. भाडे 1600 डॉलर प्रतिमहिना आहे. न्यूयॉर्क सिटी, बोस्टन आणि सिएटलमध्येही अशा प्रकारच्या प्रकल्पांवर काम केले जात आहे. न्यूयॉर्कचे नवीन युनिट उंच छत, मोठ्या खिडक्या आणि फोल्डिंग फर्निचरमुळे अधिक मोकळी जागा असल्याचा भास देतात. 250 वर्गफुटांच्या मायक्रो अपार्टमेंटची किंमत खूप
कमी असेल.

प्रेक्षकांची हेरगिरी ( सीन ग्रेगरी)- स्टेडियममध्ये बसून खेळ पाहणा-यांवर लक्ष ठेवण्याची तयारी पूर्ण झाली आहे. व्हिडिओ फुटेज, विश्लेषणात्मक सॉफ्टवेअर आणि संगणकतज्ज्ञ पथकाच्या माध्यमातून प्रशिक्षक, व्यवस्थापकांना आपल्या खेळाडूंची ताकद, उणिवा व प्रतिस्पर्धी पथकांविषयी सर्व काही माहीत असते. संगणक वैज्ञानिक जॉर्ज विलियम्स प्रश्न उपस्थित करतात, तुम्ही या तंत्रज्ञानाचा वापर प्रेक्षकांवर कराल तर काय होईल? कोणत्या खेळाडूने कमाल केल्यावर प्रेक्षक जल्लोष करतात, कोणत्या संगीतावर ते थिरकतात याची माहिती टीमला हवी असेल. विल्यम्सने मागील तीन वर्षांत अशा प्रकारचे कॅमेरा सॉफ्टवेअर तयार केले आहे, जे समर्थकांच्या चेह-या वरील भाव टिपू शकेल. हा कॅमेरा स्टेडियममध्ये खेळाडूंना प्रोत्साहन देताना, चेतवताना आणि मोबाइलवर चर्चा करणा-या प्रेक्षकांचे हावभाव टिपेल. यामुळे आपल्या जाहिरातीवर किती प्रेक्षकांचे लक्ष आहे, याची माहितीही एखाद्या कंपनीला मिळू शकेल. हे तंत्रज्ञान खासगी जीवनाशी निगडित चिंता वाढवते. परंतु विल्यम्सच्या मते, प्रेक्षकांचे वास्तविक फुटेज रेकॉर्ड होणार नाही. ते एखाद्या नकाशासारखे असेल.

टॉइज अँड गेम्स ( डॅन मॅकसाई) - मुलींना खेळातही स्वयंपाक तयार करणे आणि नटायला आवडते. मुले निर्मितीशी (कन्स्ट्रक्शन) निगडित घडामोडी आणि खेळात सहभाग घेतात. खेळण्यांच्या दुकानांत डोकावल्यावरही हाच संदेश मिळतो. अमेरिकासह अनेक देशांमध्ये टॉय कंपन्या खेळण्यांच्या विश्वात समानता कायम करण्याचा गांभीर्याने विचार करत आहेत. मागील सहा वर्षांत मॅटेलने बार्बी कन्स्ट्रक्शन सेट सादर केला आहे. हासब्रो कंपनीने मुलींसाठी असे ओव्हन सादर केलेत जे मुलांसाठी अनुकूल वाटतात. या नवीन खेळण्यांच्या रंगसंगतीत जेंडरची काळजी घेण्यात आली आहे. मुलींसाठी गुलाबी आणि मुलांसाठी निळा रंग निवडण्यात आला आहे. खेळण्यांच्या स्वरूपात बदलाचे मानसशास्त्रीय फायदे आहेत. मुली जर निर्मितीशी निगडित खेळण्यांसाठी वेळ घालवत असतील तर तंत्रज्ञानासारख्या क्षेत्रात त्यांची रुची निर्माण करता येऊ शकेल. याच प्रकारे लेखन, कुकिंगशी मुलांना जोडता येणे शक्य आहे.

रोबोटवर कसे कराल नियंत्रण ( मेसिमो केलाब्रेसी) - रोबोटिक क्रांतीने मानवापुढे भय निर्माण केले आहे की, रोबोट आपल्याप्रमाणे स्मार्ट आणि सक्षम तर आहे; परंतु त्याच्यासोबत नैतिकतेचे कोणतेही आवरण नाही. रोबोटने कठीण काम करण्यास सुरुवात केली आहे. यावरून प्रश्न उपस्थित होतो की, जर त्याने काही चुकीचे काम केले तर त्याला कोण जबाबदार असेल? निर्माणकर्ते, उपयोग करणारे आणि सॉफ्टवेअर तयार करणारे जबाबदार असतील? रोबोटमुळे समस्याही निर्माण होतील. रोबोट कार अपघातग्रस्त होईल. कोणताही ड्रोन आॅपरेटर कुणाच्याही खासगी जीवनात लुडबुड करेल. लॉनवरील गवत कापणारा रोबोट शेजा-या ंच्या कुत्रे, मांजरीलाही जखमी करू शकेल. खटले चालतील आणि निर्माता कंपन्यांवर दंड लावला जाईल. अशा परिस्थितीत सरकारने काय करायला हवे? ड्रायव्हररहित कारचा सरळ संबंध सामान्य लोकांच्या सुरक्षिततेशी आहे. निर्मात्यांना यात सुरक्षिततेची हमी घ्यावी लागेल. विमा कंपन्या कार निर्मात्यांच्या सुरक्षितता रेकॉर्डच्या आधारावर संभाव्य धोक्याचे मूल्य निश्चित करतील. घर, उद्योगात काम करणा-या रोबोटसाठी अ‍ॅप तयार केले जावेत. गडबड झाल्यास याची जबाबदारी अ‍ॅप बनवणा-या ची किंवा युजरची असेल.

संविधानाची गरज ( फरीद झकेरिया) - अरब वसंत काळात हुकूमशाही सरकारविरोधात सार्वजनिक ठिकाणांवर जमणा-या लाखोंच्या गर्दीने अरब देशांमध्ये उदारवादी लोकशाही स्थापनेसाठी होईल, अशी आशा जागवली होती. दोन वर्षांनंतर याचे मिश्र संकेत दिसून येत आहेत. लोकांच्या समर्थनापेक्षा लिखित दस्तऐवज महत्त्वाचे आहेत. निवडणुकांऐवजी संविधानावर अधिक भर हवा. ज्या देशात कायद्याच्या राज्याची जुनीच परंपरा आहे, ते स्वत:च्या अधिकारांच्या सुरक्षिततेसोबतच लोकशाही संस्कृतीच्या विकासात यशस्वी होतात.

आपल्यासोबतच असू द्यात डॉक्टर ( अलेक्झांड्रा सिफेरलिन) - रुग्णांवर सतत लक्ष ठेवण्यासाठी डॉक्टरांकडे जाणे, किचकट तपासण्या करण्याची गरज भासते. तपासण्या करणे आणि पट्टी बांधणे सोपे झाले तर? बायोइलेक्ट्रॉनिक्सच्या माध्यमातून हे शक्य आहे. शरीरात परिधान करता येणा-या अशा प्रकारच्या छोट्या वाय-फाय सेन्सरची निर्मिती केली जात आहे जे हृदय, नाड्यांचे धडकणे, शरीराचे तपमान, पाण्याच्या पातळीसारखी महत्त्वाची माहिती एकत्र करत तुमच्या डॉक्टर किंवा स्मार्ट फोनला पाठवतील. रुग्णाजवळ शरीरासंबंधीची माहिती असल्याने तो आपल्या आरोग्याप्रति सतर्क होईल. खर्चही कमी होईल. बायोइलेक्ट्रॉनिक्स कंपनी एमसी-10चे सीइओ डेव्हिड लस्के यांचा दावा आहे की, आम्हाला जग बदलण्याची इच्छा आहे. एमसी-10चे अनेक सेन्सर बाजारात येण्यासाठी जवळपास तयार आहेत. त्यांची किंमत एक ते दहा डॉलरदरम्यान असेल.