आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूतान नरेश राष्ट्रपतींच्या स्वागताला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
थिम्पू - राष्ट्रपती प्रणव मुखर्जी शुक्रवारी भूतान दौ-यावर दाखल झाले आहेत. भूतान नरेश जिग्मे खेसर नामग्येल वाँगचूक यांनी प्रोटोकॉल मोडून पॅरो येथील विमानतळावर त्यांचे स्वागत केले.

२६ वर्षांनंतर भारताच्या राष्ट्रपतींनी भूतानला भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे. मुखर्जी यांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर मुखर्जी आणि जिग्मे यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली. शिक्षण क्षेत्रात दोन्ही देशांत सहकार्य करार होण्याची शक्यता आहे. मुखर्जी यांच्यासमवेत रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा, खासदार मुख्तार अब्बास नक्वी, काँग्रेसचे गौरव गोगोई यांचे शिष्टमंडळही आहे.