Home | International | Other Country | bidve murder a hate crime, says uk police

अनुज बिडवे वंशभेदाच्या हिंसाचाराचा बळी - ब्रिटन पोलिस

वृत्तसंस्था | Update - Dec 31, 2011, 12:31 AM IST

भारतीय विद्यार्थी अमोल बिडवेची हत्या वंशभेदाचा हिंसाचार किंवा हेट क्राइममधून झाली असावी, असे ब्रिटन पोलिसांना वाटते.

  • bidve murder a hate crime, says uk police

    लंडन - भारतीय विद्यार्थी अनुज बिडवेची हत्या वंशभेदाचा हिंसाचार किंवा हेट क्राइममधून झाली असावी, असे ब्रिटन पोलिसांना वाटते. हत्येचा तपास त्याच दिशेने सुरू असल्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.
    तपासाच्या दृष्टीने आवश्यक असलेला उद्देश नेमकेपणाने आम्ही ठरवलेला नाही. ही हत्या वंशभेदातून झाल्याचा असा कोणताही पुरावा आमच्या हाती नाही. परंतु हा तिरस्कारातून झालेल्या हत्येचा प्रकार असावा, हे गृहीतक आम्ही मानू लागलो आहोत, असे वरिष्ठ पोलिस अधिकारी केव्हिन मलिगन यांनी सांगितले.
    अनुज आपल्या मित्रांसोबत जेव्हा सॅलफर्डमध्ये फिरत होता. त्यावेळी त्याची गोळी मारून हत्या करण्यात आली. 26 डिसेंबर रोजी तो मित्रांसोबत फिरत असतानाच ऐन रस्त्यात ही घटना घडली. दोन जणांनी त्यांना रोखले. त्यानंतर त्यापैकी एकाने त्यास जवळून गोळी मारली. उत्तरीय तपासणीचा अहवालदेखील हेच सांगत आहे. अनुजला डोक्यात जवळून गोळी मारण्यात आली. एका छोट्या हँडगनच्या साह्याने हा हल्ला करण्यात आला. परंतु घटनेत वापरण्यात आलेले हत्यार अद्याप मिळालेले नाही, असे मलिगन यांचे म्हणणे आहे. अजूनही पोलिस सॅलफर्ड व ग्रेटर मँचेस्टर भागातील घराघरांत जाऊन चौकशी करत आहे.
    श्रद्धांजली - अनुज बिडवेला सोशल नेटवर्किंग साइट फेसबुकवरून श्रद्धांजली वाहिली जात आहे. लँकेस्टर विद्यापीठाचा विद्यार्थी असलेल्या एका विद्यार्थ्याने त्यासाठी फेसबुकवर एक पेजदेखील तयार केले आहे. अनुजच्या स्मृतीनिमित्त नवीन वर्षात एका शांती मोर्चाचे आयोजन करण्याचाही मानस व्यक्त करण्यात आला आहे. अनुजचे पार्थिव भारतात नेण्यासाठी त्याचे नातेवाइक याच आठवड्यात ब्रिटनमध्ये येणार आहेत.

Trending