आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पृथ्‍वीच्‍या अतिशय जवळून गेली महाकाय उल्‍का, महाविनाश टळला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


रशियामध्‍ये उल्‍का वर्षावामध्‍ये आतापर्यंत 1000 जण जखमी झाले आहेत. एका मोठ्या उल्‍केचा स्‍फोट झाल्‍यामुळे उल्‍का वर्षाव झाल्‍याचे खगोल शास्‍त्रज्ञांचे म्‍हणणे आहे. तर अंतराळातील आणखी एका घटनेकडे खगोल शास्‍त्रज्ञांनी लक्ष वेधले आहे. एक मोठी उल्‍का पृथ्‍वीच्‍या अतिशय जवळून गेली. ही उल्‍का पृथ्‍वीवर धडकली असती तर प्रलय आणि महाविनाश झाला असता.

भारतात शुक्रवारी मध्‍यरात्रीनंतर 1 वाजता आकाशात एक अभुतपूर्व नजारा दिसला. आकशात चमकदार वस्‍तू अतिशय वेगाने प्रवास करताना दिसली. ही वस्‍तू म्‍हणजे एक मोठी उल्‍का होती. जवळपास 8 किलोमीटर प्रति सेकंद एवढ्या वेगाने तिचा प्रवास होता. परंतु, महत्त्वाची बाब म्‍हणजे ही उल्‍का पृथ्‍वीपासून केवळ 27 हजार 700 किलोमीटर अंतरावरुन गेली.