आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुटबॉलच्या मैदानासारखे मोठे असू शकतात एलियन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- एलियनविषयीच्या (परग्रह प्राणी)एका ताजा संशोधनात ब्रिटनच्या सॅटेलाइट विशेषज्ञ आणि सरकारच्या सल्लागार डॉ. मॅगी एडेरिन-पोपोक यांनी एलियन जेलीफिशसारखे असू शकतात, असा दावा केला आहे. त्यांचा आकार फुटबॉलच्या मैदानासारखा मोठा असू शकतो. पोपोक युरोपीय अंतराळ
संशोधन कंपनी आॅस्ट्रियममध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञ आहे.
एलियन छोट्या-छोट्या हिरव्या रंगाचे व काहीसे विचित्र दिसणारे व्यक्ती (हॉलीवूड चित्रपटात दाखवल्यासारखे)आहेत, ही संकल्पना पोपोक यांनी फेटाळून लावली आहे. आपण ज्या एलियनबाबत विचार करतो, वास्तवात ते तसे नाहीत. एलियन्स आपल्यापेक्षा आधुनिक असू शकतात, असे पोपोक यांचे संशोधन आहे.
मिथेनच्या ढगात राहत असावेत: संशोधनाबाबत पोपोक म्हणतात की, मिथेनच्या ढगाने आच्छादलेल्या एखाद्या ठिकाणी एलियन्सचे अस्तित्व शक्य आहे. हे ठिकाण शनीचा उपग्रह टायटन असू शकते. त्यांचे अन्न रसायनमिश्रित असू शकते तसेच आपल्या आयुष्यासाठी ते त्वचेमार्फत प्रकाश घेत असावेत.
जेलिफिशसारखे एलियन्स : जेलिफिशसारख्या एलियन्सच्या पोटाखाली सिलिकॉनची संत्र्यासारखी रचना असू शकते, असे डॉ. पोपोक यांचे म्हणणे आहे. या संत्र्यासारख्या रचनेचा उपयोग एलियन्स सुरक्षेसाठी करू शकतात. एलियन्सच्या शरीरामध्ये कांद्याच्या आकाराची पिशवी असू शकते, जी त्यांना उडी घेण्यासाठी साहाय्यभूत ठरू शकते.
त्यांच्याशी सामना होऊ नये : एलियन्स आपल्यापासून खूप लांबवर असल्यामुळे त्यांच्याशी सामना होण्याची क्वचित शक्यता आहे, असे पोपोक यांचे म्हणणे आहे. ताजे संशोधन ग्राह्य धरल्यास आकाशगंगेत किमान चार एलियन संस्कृती आहेत. 1970 मध्ये अंतराळात वोयेजर-1 यान सोडले होते. याचा प्रवास अजूनही चालू आहे. सूर्यानंतर आपला सर्वात जवळचा तारा प्राक्जिमा सेंटॉरी आहे. या ठिकाणी वोयेजरला पोहोचण्यासाठी 76 हजार वर्षे लागतील.
एलियन्सचे सिलिकॉन आधारित आयुष्य- माणसाचे आयुष्य कार्बन आधारित असते. मात्र, पोपोक एलियन्सचे आयुष्य सिलिकॉनवर आधारित असल्याचे मानतात. मूलद्रव्यांच्या सूचीत कार्बनच्या खाली सिलिकॉन येतो. सिलिकॉनमध्ये कार्बनसारखे साम्य आहेत आणि तो ब्रह्मांडामध्ये मुबलक प्रमाणात आढळतो. त्यांचा डीएनए आमच्यासारखा असू शकतो, परंतु सिलिकॉन आधारित असेल.
कोण आहेत पोपोक?- 1968 मध्ये लंडनमध्ये जन्मलेल्या पोपोक नायजेरिया वंशाच्या ब्रिटिश अंतराळ शास्त्रज्ञ आहेत. आॅस्ट्रियममध्ये त्या आॅप्टिकल इंस्ट्रुमेंटेशन ग्रुपच्या संशोधन प्रमुख आहेत.